लग्नाआधीच मृणाल ठाकूर आई;

बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्री या लग्नाच्या आधी आई झाल्या आणि त्यांनी जगासमोर हे आनंदाने मान्य केले. असेच काहीसे अभिनेत्री मृणाल ठाकुरच्या बाबतीत झाले आहे. मृणालने ३२ व्या वर्षी देखील लग्न केलेले नाही तर ती एका मुलीची आई झाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 9 Aug 2024
  • 12:44 pm
Entertainment news, Bollywood actresses, became mothers before marriage, Mrunal Thakur

संग्रहित छायाचित्र

बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्री या लग्नाच्या आधी आई झाल्या आणि त्यांनी जगासमोर हे आनंदाने मान्य केले. असेच काहीसे अभिनेत्री मृणाल ठाकुरच्या बाबतीत झाले आहे. मृणालने ३२ व्या वर्षी देखील लग्न केलेले नाही तर ती एका मुलीची आई झाली आहे. हे ऐकून नक्कीच तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल.  पण हे सत्य आहे की ती एका ८ वर्षांच्या मुलीची आई झाली आहे. तिने  स्वत: हे स्वीकार केले आहे, मान्य केले की आता ती ज्या बाळाला जन्म देईल ते तिचे ते दुसरे बाळ असेल. मृणाल ठाकुरने एका मुलाखती दरम्यान याविषयी सांगितले होते. त्याचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आता त्या सगळ्यात एक नवा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडीओत तिनं एका लहान मुलीला तिची मुलगी असल्याचे म्हटले आहे. ती मला यशना म्हणून हाक मारते किंवा ममा बोलते. ती गुणी मुलगी आहे आणि फक्त डोळ्यांनी बोलते. तिच्याकडून शिकणे सुंदर आहे. त्या मुलीला माहित नाही की तिने मला शिकवले आहे.

मृणाल ठाकुरने त्या मुलीला दत्तक घेतले असे तुम्हाला वाटत असेल. तिने त्या मुलीला दत्तक घेतलेले नाही किंवा तिला मृणालने जन्म दिलेला नाही. ही मुलगी बालकलाकार कियारा खन्ना आहे. मृणालने कियारासोबत दाक्षिणात्य कलाकार नानीच्या 'हाय नन्ना' या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात मृणालने 'यशना' ही भूमिका साकारली होती आणि कियाराने ‘माही’ ही भूमिका साकारली होती.  व्हायरल होत असलेल्या या व्हीडीओला स्वत: कियाराने शेअर केले आहे. हा  व्हीडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story