रोमान्स अन् कॉमेडीचा तडका असलेला ‘विक्की-विद्या का वो वाला वीडियो’

अष्टपैलू अभिनेता राजकुमार राव आणि नवी नॅशनल क्रश तृप्ती डिमरी यांचा आगामी चित्रपट ‘विक्की-विद्या का वो वाला वीडियो’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या कॉमेडी-ड्रामा चित्रपटाची कथा नव्वदच्या दशकातील एका नवविवाहित जोडप्यावर आधारित आहे. या चित्रपटात मल्लिका शेरावतची एन्ट्री सरप्राईज पॅकेज ठरली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 13 Sep 2024
  • 05:06 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

अष्टपैलू अभिनेता राजकुमार राव आणि नवी नॅशनल क्रश तृप्ती डिमरी यांचा आगामी चित्रपट ‘विक्की-विद्या का वो वाला वीडियो’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या कॉमेडी-ड्रामा चित्रपटाची कथा नव्वदच्या दशकातील एका नवविवाहित जोडप्यावर आधारित आहे. या चित्रपटात मल्लिका शेरावतची एन्ट्री सरप्राईज पॅकेज ठरली आहे.

राजकुमार आणि तृप्ती यांनी या चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. दोघांनी एका कार्यक्रमात त्याचा ट्रेलर रिलीज केला. ट्रेलरमध्ये नवविवाहित विक्की आणि विद्या यांनी त्यांच्या लग्नाच्या रात्रीचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे दाखवण्यात आले होते. त्याची सीडी कुठेतरी चोरीला गेली होती. या सीडीचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक विजय राज मल्लिका शेरावतच्या प्रेमात पडतात.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मल्लिकादेखील दिसत आहे. एका मोठ्या ब्रेकनंतर ही अभिनेत्री एका व्यावसायिक चित्रपटात दिसणार आहे. साडेतीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये राजकुमार आणि तृप्तीशिवाय विजय राज, मल्लिका आणि टिकू तलसानियासारखे कलाकार दिसत आहेत. याशिवाय शहनाज गिल आणि दलेर मेहंदीदेखील चित्रपटातील गाण्यांमध्ये स्पेशल अपिअरन्स देताना दिसणार आहेत.

या चित्रपटाच्या एका गाण्यात दलेर मेहंदीचा तर दुसऱ्या गाण्यात शहनाज गिलचा कॅमिओ आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन 'ड्रीमगर्ल' फेम दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी केले आहे. ११ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘विक्की-विद्या का वो वाला वीडियो’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची टक्कर आलिया भट्ट आणि वेदांग रैना स्टारर 'जिगरा'सोबत होणार आहे.  राजकुमारचा मागील चित्रपट 'स्त्री २' ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. तृप्ती 'बॅड न्यूज'मध्ये विकी कौशल आणि एमी विर्कसोबत दिसली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story