माधुरीच्या 'एक दो तीन' गाण्याला ३६ वर्षे पूर्ण!

‘अबोध’ या १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून माधुरी दीक्षितने सिनेविश्वात पदार्पण केले. १० ऑगस्ट रोजी माधुरीच्या मनोरंजन विश्वातील प्रवासाला ४० वर्षे पूर्ण झाली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 13 Aug 2024
  • 03:47 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

‘अबोध’  या १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून माधुरी दीक्षितने सिनेविश्वात पदार्पण केले. १० ऑगस्ट रोजी माधुरीच्या मनोरंजन विश्वातील प्रवासाला ४० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने बॉलिवूडची ही ‘धकधक गर्ल’ सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. माधुरीच्या चाहत्यांसाठी या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या दरम्यानचा नुकताच एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माधुरीने ‘अबोध’ चित्रपटातून पदार्पण केले असले तरीही, तिला खरी ओळख ‘तेजाब’मुळे मिळाली. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ चित्रपटात माधुरीसह अनिल कपूर, चंकी पांडे, अनुपम खेर, सुरेश ओबेरॉय यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘तेजाब’मधले प्रत्येक गाणे सोशल मीडियावर सुपरहिट ठरले होते. यापैकी ‘एक दो तीन’ हे एव्हरग्रीन गाणे आजही प्रचंड लोकप्रिय आहे. प्रत्येक समारंभात हे गाणे वाजवले जाते. माधुरीने या ३६ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर पुन्हा एकदा जबरदस्त डान्स केला आहे.  माधुरी दीक्षितचा व्हीडीओ ‘विरल भय्यानी’ या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. अभिनेत्रीच्या सिनेकारर्किदीला ४० वर्षे पूर्ण झाल्याने अमेरिकेत ‘हूक स्टेप विथ माधुरी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्रीने तिच्या गाजलेल्या गाण्यांच्या हूकस्टेप्स करून दाखवल्या. याशिवाय माधुरी तिच्या चाहत्यांसमोर ‘एक दो तीन’ गाण्यावर थिरकली.

माधुरीने अमेरिका दौरा करण्याआधी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी अभिनेत्रीला डॉ. श्रीराम नेने यांच्याशी संवाद साधताना कधी बॉलिवूड चित्रपटातील गाणी, संवादांचा वापर केलाय का, असाही प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी माधुरीने दिलखुलासपणे उत्तर देत माझ्या नवऱ्याला हिंदी येत नाही, तो मराठी छान बोलतो असे सांगितले होते.  माधुरीच्या या डान्स व्हीडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी देखील तिचा फिटनेस थक्क करणारा आहे. त्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसह नेटकऱ्यांनीसुद्धा या 'धकधक गर्ल'चे कौतुक केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story