माधुरी दीक्षित बनणार 'मिसेस देशपांडे'

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द फेम गेम' मधून ओटीटीवर पदार्पण केले. आता दोन वर्षांनंतर माधुरी एक नवी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 7 Aug 2024
  • 03:43 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द फेम गेम' मधून ओटीटीवर पदार्पण केले.  आता दोन वर्षांनंतर माधुरी एक नवी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. असे म्हटले जाते की 'डोर' फेम नागेश कुकुनूर 'मिसेस देशपांडे' नावाने एक नवी वेब सीरिज बनवणार आहेत. ज्यासाठी माधुरी दीक्षितसोबत आधी चर्चा सुरु होती. या सीरिजमध्ये तिची भूमिका ही एका सीरियल किलरची असणार आहे. या नव्या वेब सीरिजची पटकथेपासून माधुरी दीक्षितच्या भूमिकेच माहिती समोर आली आहे.

'द फेम गेम' मध्ये माधुरी दीक्षित एक अशी भूमिका साकारणार आहे. जी स्वत: तिच्या गायब होण्यामागचा कट रचते आणि आता ती 'मिसेस देशपांडे' मध्ये एका खतरनाक सीरियल किलरच्या भूमिकेत दिसणार आहे. 'मिसेस देशपांडे' विषयी नागेश कुकुनूर आणि माधुरी दीक्षितमध्ये चर्चा सुरु आहे. आता 'मिसेस देशपांडे' मधून माधुरी दीक्षित वेगळे काही करताना दिसणार आहे. पोलिस एका सीरियल किलरला पकडण्यासाठी त्यांच्या मोडस ऑपरेंडीला समजण्यासाठी दुसऱ्या सीरियल किलरला कामावर ठेवता. हा एक फ्रेंच सीरिजचा रीमेक आहे.  'मिसेस देशपांडे' ही वेब सीरिज एका फ्रेंच वेब सीरिजवर आधारीत असणार आहे. या वेब सीरिजमध्ये पोलिस सीरियल किलरला पकडण्यात आणि त्याची पुढची प्लॅनिंगला अपयशी करण्याचा प्रयत्न करत असतात. पण पोलिसांसमोर अनेक अडचणी येतात.  माधुरी ही सीरियल किलरच्या भूमिकेत दिसणार आहे का? कारण प्रेक्षकांना तिला पोलिस किंवा मग सीरियल किलरपैकी कोणत्याही भूमिकेत पाहायला नक्कीच आवडेल.

'मिसेस देशपांडे' या वेब सीरिजमध्ये नागेश कुकुनूर दोन वर्षानंतर ओटीटीवर पुन्हा येणार आहे. त्याआधी त्याने देखील २०२२ मध्ये 'मॉडर्न लव्ह हैदराबाद' चे  दिग्दर्शन केले होते.  तर माधुरी आता 'भूल भुलैया 3' मध्ये देखील दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी आणि विद्या बालन देखील आहे. तर हा चित्रपट खूप खास असणार आहे. त्याचे कारण म्हणजे या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि विद्या बालनमध्ये खास डान्स असणार आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story