कंगनाची 'इमर्जन्सी'

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया अन् वक्तव्यांसाठी चर्चेत असते. त्यावरुन तिला अनेकदा ट्रोलही व्हावे लागले आहे.

 Kangana's'Emergency'

कंगनाची 'इमर्जन्सी'

मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम राहून तिनं अनेकांची नाराजीही ओढावून घेतल्याचे दिसून आले आहे. कंगनाने यापूर्वी देखील तिच्या राजकीय प्रवेशाविषयी वक्तव्ये केली आहे. आता एका मुलाखतीमध्ये तिला पुन्हा त्यावरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नावर तिने दिलेले उत्तर तिच्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे. सध्या कंगनाचा भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित  'इमर्जन्सी' नावाच्या चित्रपटाची चर्चा आहे. त्यात तिने इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. जून महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कंगनाला त्या मुलाखतीमध्ये तुला देशाचा प्रधानमंत्री व्हायला आवडेल का असा प्रश्न विचारण्यात आला होता.त्यावर तिने दिलेले उत्तर हे चर्चेत आहे.  कंगनाच्या त्या चित्रपटातील इंदिरा गांधी यांच्या भूमिकेतील लूक पाहून तिचे नेटकऱ्यांनी कौतुक केले होते . त्यानंतर या चित्रपटाचे चाहत्यांना वेध लागले आहेत. कंगना म्हणते, कला हा एक व्यवसाय आहे. कलाकारांवर सरस्वती देवीची कृपा असते. तुम्हाला माहिती आहे की, आपण राजकारणाकडे कोणत्या नजरेने पाहतो. त्या जगात जाण्याची माझी काही इच्छा नाही. मला त्याचा भागही व्हायचे नाही. मी कलाकार आहे आणि मला तेच काम करायला आवडेल. मला जर देशाची सेवा करण्याची एखादी संधी मिळाली तर मी नक्कीच राजकारणात जाईल. देशाला माझी गरज असल्यास मी त्या पर्यायाचा नक्की विचार करेल, असेही कंगनाने तिच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे. खरेतर  कंगनाची ही प्रतिक्रिया तिच्याच एका जुन्या वक्तव्यावरुन आली आहे. तिने पूर्वी असे म्हटले होते की, मला एक राजकीय व्यक्ती व्हायचे आहे. पण याबाबत लोकांना माझ्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. त्यांचा जो निर्णय असेल तो मला मान्य करावा लागेल,  असे कंगनाने म्हटले होते.

Share this story