Ajith Kumar Car Accident : दुबईत कार रेसिंगदरम्यान साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा भीषण अपघात, Video सह मोठी अपटेड आली समोर...

आपल्या अभिनयासाठी तसेच रेसिंग ट्रॅकवर वेगाने गाडी चालवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित कुमारच्या कारचा ताशी 180 किलोमीटर वेगाने अपघात झाला. या काळात त्यांची कार सात वेळा उलटल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 8 Jan 2025
  • 02:14 pm

Ajith Kumar Car Accident

Ajith Kumar Car Accident :  साउथ चित्रपटांचा सुपरस्टार अजित कुमार त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी तसेच त्याच्या खास रेसिंग कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच अभिनेता दुबईत एका धोकादायक अपघाताला सामोरे गेला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांची चांगलीच तारांबळ उडाली असून लोक अभिनेत्याबद्दल चिंतेत आहेत.  या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की अजित कुमार कार रेसिंगचा सराव करत होते, परंतु अभिनेत्याच्या कारचा वेग खूप जास्त होता आणि त्यामुळे भीषण अपघात झाला पण सुदैवानं अजित कुमार पूर्णपणे बरे आहेत आणि त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

वास्तविक, तामिळ चित्रपटांचा सुपरस्टार अजित कुमार याचा दुबईत भीषण अपघात झाला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्याच्या कारला खूप भीषण अपघात झाल्याचे दिसत आहे. दिलासादायक बातमी म्हणजे  या अपघातातून अजितकुमार थोडक्यात बचावले आहेत. अभिनेता अजित कुमार त्याच्या आगामी दुबई 24H रेसिंगसाठी सराव करत असताना त्याच्या कारला अपघात झाला. अजित कुमार हे मोटर रेसिंगसाठीही ओळखले जातात. अजित कुमार अनेकदा या प्रकारच्या रेसिंग स्पर्धेत भाग घेतो. पण यावेळी त्याचा रेसिंग करताना अपघात झाला.

काल म्हणजे मंगळवारी (7 जानेवारी) सरावाच्या वेळी त्याची कार गतिरोधकाला धडकली. त्यावेळी कार ताशी 180 किलोमीटर वेगाने धावत असल्याची माहिती आहे. या धडकेनंतर कार सात वेळा फिरताना दिसली. या भयानक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड  व्हायरल होत आहे. अजित कुमार यांच्या टीमने या घटनेचा व्हिडिओ ट्वविटर ( X) या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये कार धडकल्यानंतर सात वेळा फिरताना दिसत आहे. मात्र, सुरक्षा उपकरणांमुळे अभिनेत्याचे प्राण वाचले. त्यांना तात्काळ कारमधून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले.

अजित कुमार हे रेसिंग टीमचे मालकही आहेत. ते या शर्यतीत आपले तीन सहकारी मॅथ्यू डेट्री, फॅबियन डफीक्स आणि कॅमेरॉन मॅक्लिओडसह सहभागी होणार होते. फॅबियन डफीक्स (Fabien Dufeix) यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अजित कुमारच्या रेसिंग संघाचे व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला होता. यंदा ही शर्यत दुबईत 11 आणि 12 जानेवारीला होणार आहे. दरम्यान, अजित कुमार लवकरच 'विदमुयार्ची' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय अभिनेता 'गुड बॅड उगली'मध्येही दिसणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Share this story