संग्रहित छायाचित्र
अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये अभिनय, चित्रपटांचे दिग्दर्शन, गायन अशी पाच दशकांपेक्षा अधिक मोठी, बहुरंगी कारकीर्द गाजवणारे सचिन पिळगांवकर आता नव्या वर्षात नवी इनिंग सुरू करत आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या धुन प्रॉडक्शन निर्मित आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित 'स्थळ' या बहुचर्चित चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिळगांवकर करणार असून, महिला दिनाच्या औचित्याने ७ मार्चला 'स्थळ' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 'स्थळ' चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा आणि जयंत दिगंबर सोमलकर यांनी 'स्थळ' या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग ढवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमले, गौरी बदकी, मानसी पवार या नव्या दमाच्या कलाकारांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक जयंत दिगंबर सोमलकर यांनी शॉर्ट फिल्म्ससह ‘गिल्टी माईंड्स’ या गाजलेल्या वेब सीरिजचे सहदिग्दर्शन केले होते. 'स्थळ' हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट आहे.