संग्रहित छायाचित्र
‘वो लड़की है कहाँ’ या गाण्याचे नाव जरी घेतले तरी डोळ्यासमोर पटकन येते ती म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. गेली दोन दशके आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने सर्वांनाच भुरळ घातली आहे. मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात तिने आपले अढळ स्थान निर्माण केलेले आहे. ‘दिल चाहता हैं’, ‘दोघी’, ‘गुलाबजाम’, ‘प्यार तुने क्या किया’ ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मानवत मर्डर्स’पर्यंत अशा विविधांगी प्रोजेक्ट्समधून अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीने एक आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
या अभिनेत्रीच्या घरी नव्या-कोऱ्या आलिशान गाडीचे आगमन झाले आहे. सोनालीने मर्सिडीज-बेंझ ही गाडी खरेदी केली आहे. अभिनेत्रीने गाडी खरेदी करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनालीने शोरुममध्ये आपल्या कुटुंबीयांसह नव्या गाडीची पूजा केली. यावेळी अभिनेत्रीचे स्वागत करण्यासाठी सुंदर सजावटही करण्यात आली होती. दरम्यान, अभिनेत्रीच्या नव्या गाडीच्या फोटोंवर अक्षय केळकर, वैदेही परशुरामी या मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, नुकतीच ती ‘मानवत मर्डर्स’ या थ्रिलर सीरिजमध्ये झळकली होती. यामध्ये तिच्यासह मकरंद अनासपुरे, आशुतोष गोवारीकर आणि सई ताम्हणकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. सोनालीने साकारलेल्या रुक्मिणीच्या भूमिकेला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली.