Marathi Serials : 'या' मराठी मालिकांनी जिंकली रसिकांची मने

सध्या मराठी मालिकाविश्वात सतत काहीना काहीतरी घडताना दिसत आहे. एका बाजूला नवनवीन मराठी मालिका सुरू होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला जुन्या मराठी मालिका आणि हिंदीतील लोकप्रिय मालिका मराठीत डब करून दाखवल्या जात आहेत.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सध्या मराठी मालिकाविश्वात सतत काहीना काहीतरी घडताना दिसत आहे. एका बाजूला नवनवीन मराठी मालिका सुरू होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला जुन्या मराठी मालिका आणि हिंदीतील लोकप्रिय मालिका मराठीत डब करून दाखवल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून ‘सोनी मराठी’ वाहिनीवर हिंदी डब मालिका दाखवल्या जात आहेत. त्यामुळे ‘सोनी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिका नुकत्याच बंद झाल्या आहेत. जून २०२१ मध्ये सुरू झालेली ‘गाथा नवनाथांची’ मालिका ऑफ एअर झाली आहे. शनिवारी, ४ जानेवारीला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. या मालिकेत नवनाथांची जीवनकथा दाखवण्यात आली होती. अभिनेता जयेश शेवाळकर, अनिरुद्ध जोशी, नकुल घाणेकर, मनोज गुरव, सुरभी हांडे, मृदुला कुलकर्णी, प्रतीक्षा जाधव, प्रथमेश विवेकी, शंतनु गंगणे असे बरेच कलाकार मंडळी ‘गाथा नवनाथांची’ मालिकेत पाहायला मिळाले होते. गेल्या साडेतीन वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि ४ जानेवारीला शेवटचा भाग प्रसारित झाला. या निमित्ताने ‘सोनी मराठी’च्या सोशल मीडियावर खास पोस्ट करण्यात आली आहे.

‘सोनी मराठी’ने ‘गाथा नवनाथांची’ मालिकेचे पोस्टर शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ''गाथा नवनाथांची’ या मालिकेवर नाथ भक्त आणि प्रेक्षकांनी दाखवलेले प्रेम आणि प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!,'' असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. पण यावर काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘मालिका का बंद केली? आम्ही रोज पाहायचो…चांगली मालिका होती’, ‘नवनाथांचे चरित्र उघडपणे दाखवणारी अशी मालिका पुन्हा होणे शक्य नाही’, ‘मालिका एवढ्या लवकर काय संपवली?’, ‘हे बंद करून काय डब मालिका लावणार? काय मूर्खपणा चाललाय’, अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

‘गाथा नवनाथांची’सह ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ हीदेखील मालिका बंद झाली आहे. सुहानी नाईक, विजया बाबर, वीणा जामकर, विक्रम गायकवाड असे अनेक कलाकार असलेली ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ही मालिका चांगली लोकप्रिय ठरली. २०२२ पासून सुरू झालेली ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ मालिकेचे दोन पर्व पाहायला मिळाले. पण, ४ जानेवारीला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. या संदर्भातही ‘सोनी मराठी’च्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Share this story