अभिजितला आली मानहानीची नोटीस

आपल्या आवाजासाठी प्रसिद्ध असलेला अभिजित आपले म्हणणे बेधडकपणे मांडण्यासाठी ओळखला जातो. गायक अनेकदा वादग्रस्त विधानेही करत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिजितने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 6 Jan 2025
  • 10:42 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बॉलिवूड गायक अभिजित भट्टाचार्य याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आपला आवाज दिला आहे. त्याची गाणी लोकांना खूप आवडतात. आपल्या आवाजासाठी प्रसिद्ध असलेला अभिजित आपले म्हणणे बेधडकपणे मांडण्यासाठी ओळखला जातो. गायक अनेकदा वादग्रस्त विधानेही करत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिजितने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. अभिजित म्हणाला होता की, महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते. आता पुण्यातील एका वकिलाने त्यांना या प्रकरणी नोटीस पाठवली आहे. अभिजित भट्टाचार्यला महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आपल्या वक्तव्याबद्दल लेखी माफी न मागितल्यास त्यांच्यावर फौजदारी खटला चालवला जाईल, असे  या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. या गायकाने अशी टिप्पणी करून आपली मर्यादा ओलांडली आहे. १५० हून अधिक देशांनी महात्मा गांधी यांच्या नावाने टपाल तिकिटे जारी केली आहेत.  त्यामुळे या गायकाने त्याच्या व्यक्तव्याची वस्तुस्थिती तपासावी, अशी सूचना नोटीसमध्ये दिली आहे.

शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये अभिजित भट्टाचार्य म्हणाला की, ‘महात्मा गांधी भारतासाठी नव्हते, ते पाकिस्तानसाठी होते. भारत आधीपासूनच भारत होता, पाकिस्तानची निर्मिती झाली होती. त्यांना चुकून राष्ट्रपिता महात्मा गांधी असे संबोधण्यात येत होते. ते पाकिस्तानचे निर्माते होते. ते पाकिस्तानचे पिता होते, आजोबा होते... सर्व काही तेच होते.’

दरम्यान अभिजित भट्टाचार्य याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका बंगाली चित्रपटात गाणे गाऊन केली होती. त्याला संगीतकार आर डी बर्मन यांनी लाँच केले होते. आशा भोसले यांच्यासोबत बंगाली चित्रपटासाठी त्याने पहिलं गाणं गायलं होतं. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तो आर डी बर्मन यांच्यासोबत गायक म्हणून स्टेज शो करत असे. अभिजित भट्टाचार्य यांनी मिथुन चक्रवर्ती, विजय आनंद, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान, सनी देओल, संजय दत्त, अक्षय खन्ना, अक्षय कुमार, हृतिक रोशन, बॉबी देओल आणि रणबीर कपूर यांसारख्या बॉलिवूड कलाकारांसाठी गाणी गायली आहेत.

Share this story

Latest