‘‘माझे पहिले लग्न तुटण्यासाठी... जावेद अख्तर यांचा खळबळजनक खुलासा

पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी खुलासा केला आहे की घटस्फोटानंतर त्यांना त्यांची माजी पत्नी हनी इराणीसाठी वाईट वाटत होते. लग्नाच्या अपयशाची ६०-७० टक्के जबाबदारी स्वतः घेतो, असेही त्यांनी सांगितले.

Javed Akhtar Marriage Disclosure

‘‘माझे पहिले लग्न तुटण्यासाठी... जावेद अख्तर यांचा खळबळजनक खुलासा

पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी खुलासा केला आहे की घटस्फोटानंतर त्यांना त्यांची माजी पत्नी हनी इराणीसाठी वाईट वाटत होते. लग्नाच्या अपयशाची ६०-७० टक्के जबाबदारी स्वतः घेतो, असेही त्यांनी सांगितले. (Javed Akhtar Marriage Disclosure)

जावेद आणि हनी यांचे लग्न १९७२ मध्ये झाले होते. या लग्नापासून त्यांना फरहान आणि झोया अख्तर ही दोन मुले झाली. मात्र, दोघेही १९८५ मध्ये वेगळे झाले.जावेद यांनी १९८४ मध्येच अभिनेत्री शबाना आझमीशी लग्न केले. जावेद म्हणाले, ‘‘माझे पहिले लग्न तुटण्यासाठी मी स्वतःला दोषी समजतो.’’

‘अँग्री यंग मॅन’ या माहितीपट मालिकेच्या अलीकडील भागात जावेद अख्तर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले आहे. आपल्या पहिल्या लग्नाबद्दलही ते उघडपणे बोलले. सलीम खानपासून वेगळे झाल्यावर त्यांचे लग्न मोडले. ते म्हणाले, ‘‘हनी या जगात एक अशी व्यक्ती आहे जिच्यासाठी मला अपराधी वाटते. आमच्या लग्नाच्या अपयशाची ६०-७० टक्के जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. मला आज जेवढी समज आहे तेवढी समज असती तर कदाचित गोष्टी चुकल्या नसत्या. हे स्वीकारणे खूप कठीण आहे, परंतु ते तसे आहे.

आई-वडिलांच्या विभक्त होण्याचा फरहान अख्तरवर खूप वाईट परिणाम झाला. वडिलांना हरवल्यासारखं त्याला वाटत होतं. याबाबत फरहान म्हणाला, ‘‘क काळ असा होता जेव्हा मी त्यांच्यावर रागावलो होतो. मला वाटले की त्यांनी फसवणूक केली.’’ जावेद यांचे पहिले लग्न तुटण्यासाठी लोकांनी शबाना आझमी यांना जबाबदार मानले. हनी इराणीपासून वेगळे झाल्यानंतर जावेद यांनी १९८४ मध्ये शबाना आझमीशी लग्न केले. 

जावेद अख्तर यांची दुसरी पत्नी झाल्यानंतर शबाना यांनाही लोकांचे टोमणे ऐकावे लागले. याबद्दल शबाना म्हणाल्या, ‘‘लोक म्हणायचे, मी घर तोडणारी आहे. अर्थात मला माझा मुद्दा स्पष्ट करायचा होता. पण नंतर मला वाटले की मी हे केले तर अनेकांना दुःख होईल. या कारणास्तव मला गप्प राहणेच योग्य वाटले.  माझे हनी इराणीसोबत खूप चांगले संबंध आहेत.’’

शबाना आझमी यांनी पुढे हनी इराणीचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘‘हनी इराणीने माझ्याशी कधीही वाईट सावत्रसारखे वागल्या नाही. मुलांसमोर त्या माझ्याविरुद्ध कधीही चुकीचे बोलल्या नाही. त्यांच्याशी माझे नाते खूप चांगले आहे. मी त्यांची खूप आभारी आहे. आम्ही तिघेही खूप चांगले आहोत, पण त्या सर्वात वर आहेत. त्यांच्याकडे खूप काही देण्यासारखे होते आणि त्यांनी ते दिले.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story