उर्वशीनेच केला खासगी व्हीडीओ लीक

उर्वशीचा एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हीडीओमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. उर्वशीचा हा बाथरुममधील प्रायव्हेट व्हीडीओ असल्याचे म्हटले जात आहे. ती पुन्हा एकदा पब्लिसिटी स्टंट करत असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 18 Jul 2024
  • 03:29 pm
private bathroom video of Urvashi, Netizens, publicity stunt, target of trollers, viral video, social media

संग्रहित छायाचित्र

अभिनेता सनी देओलच्या ‘सिंग साहब द ग्रेट’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. क्रिकेटर ऋषभ पंतसोबतचे अफेअर असो किंवा मग सोन्याचा कव्हर असलेला आयफोन हरवणे असो. उर्वशीने नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. अशातच उर्वशीचा एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हीडीओमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. उर्वशीचा हा बाथरुममधील प्रायव्हेट व्हीडीओ असल्याचे म्हटले जात आहे. ती पुन्हा एकदा पब्लिसिटी स्टंट करत असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

उर्वशीच्या या बाथरुम व्हीडीओने सोशल मीडियावर चर्चा घडवून आणली आहे. यात ती कपडे बदलताना दिसत आहे. हा व्हीडीओ केवळ पीआर स्टंट म्हणून केला असल्याच्या कमेंट्स नेटकरी करत आहेत. त्यावरून नेटकऱ्यांनी तिची चांगलीच शाळा घेतली आहे. ‘स्वस्तातला प्रमोशनल स्टंट’, असे एकाने लिहिले आहे.  तर ‘ही पब्लिसिटीसाठी काहीपण करू शकते’, असे दुसऱ्याने म्हटले आहे. ‘तिने गळ्यात मंगळसूत्र घातले आहे,  हा चित्रपटातील एखादा सीन आहे. पण पब्लिसिटीसाठी लीक केला आहे, असेही नेटकऱ्यांनी लिहिले आहे.

उर्वशीचा हा प्रायव्हेट व्हीडीओ नसून तिच्या ‘जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ (जेएनयू) या चित्रपटातील सीन लीक झाल्याचे म्हटले जात आहे. कमेंट्समध्ये अनेकांनी असा दावा केला आहे. त्याचसोबत काहींनी असाही अंदाज वर्तवला आहे की, हा ‘ग्रेट ग्रँड मस्ती 3’ या चित्रपटातील सीन आहे.उर्वशी नेहमीच चर्चेत उर्वशी रौतेला अनेकदा तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. क्रिकेटर ऋषभ पंतसोबतचे अफेअर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असतो. उर्वशीने तिच्या सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केली तरी त्या पोस्टला ऋषभ पंतशी जोडले जाते. उर्वशी आणि ऋषभ एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती.

मात्र नंतर सोशल मीडियावर दोघांनी अप्रत्यक्षपणे एकमेकांना टोमणे मारले. उर्वशीने एका मुलाखतीत आरपीचा (RP) उल्लेख केला होता. तो आरपी ऋषभ पंतच असावा, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. त्यानंतर सोशल मीडियावर ऋषभ आणि उर्वशी यांच्यात अप्रत्यक्षपणे वाद झाला. या दोघांमधील वाद जगजाहीर आहे. उर्वशी तिच्या आलिशान लाइफस्टाइलमुळेही चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी तिचा २४ कॅरेट खऱ्या सोन्याचा आयफोन हरवला होता. सोशल मीडियाद्वारे तिने चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story