मंगेशकर कुटुंबाबद्दल अपार स्नेह

मनोरंजनसृष्टीतील कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. हे कलाकार कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट, तर कधी त्यांनी केलेली वक्तव्ये यांमुळे चर्चांचा भाग बनतात. आता लोकप्रिय गायक शानने एका मुलाखतीदरम्यान मंगेशकर कुटुंबीयांबरोबर असलेल्या संबंधावर वक्तव्य केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 27 Aug 2024
  • 02:51 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मनोरंजनसृष्टीतील कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. हे कलाकार कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट, तर कधी त्यांनी केलेली वक्तव्ये यांमुळे चर्चांचा भाग बनतात. आता लोकप्रिय गायक शानने एका मुलाखतीदरम्यान मंगेशकर कुटुंबीयांबरोबर असलेल्या संबंधावर वक्तव्य केले आहे.

लोकप्रिय गायक शानने अमोल परचुरेंना नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने मंगेशकर कुटुंबीयांबरोबर असलेल्या संबंधाबाबत वक्तव्य केले. तो म्हणाला, ज्यांना मी पूजतो, त्यांच्या नावाचा म्हणजे ‘आशा भोसले’ पुरस्कार नुकताच मला मिळाला. मीना मंगेशकर यांच्यासोबत माझ्या वडिलांनी भरपूर काम केले आहे. त्यांची अनेक गाणी माझ्या वडिलांनी बंगालीमध्ये गायली आहेत. त्यांचे 'चल रे भोपळ्या टुणूक टुणुक' हे गाणे बंगालीमध्येदेखील आहे. मी जे पहिले गाणे गायले होते,  ते मीना मंगेशकर यांनी रचलेले आहे. तेव्हा मी साडेचार वर्षांचा होतो. लताजी, आशाजी, उषाजी या सगळ्यांकडून माझ्या वडिलांना खूप प्रेम मिळाले. मंगेशकर कुटुंबाकडून माझ्या वडिलांना खूप प्रेम लाभले. माझ्या वडिलांची जास्तीत जास्त गाणी उषाजींनी गायली आहेत. या घराविषयी माझ्या मनात अपार आदर आणि स्नेह आहे, असे शानने म्हटले आहे.

त्याबरोबरच शानने इंडीपॉप गाण्यांबद्दलही वक्तव्य केले आहे. इंडीपॉप हे प्रसिद्ध होत असतानाच का बंद झाले, या प्रश्नाला उत्तर देताना त्याने म्हटले, अनेक लोक त्यामध्ये यायला लागले. लोकांना वाटले की, ही प्रसिद्ध होण्याची चांगली संधी आहे. टीव्हीवर येऊ शकतो, असे लोकांना वाटू लागले. स्वत:च स्वत:चे व्हीडीओ बनवले गेले; मात्र त्यामुळे त्याचा दर्जा खालावला.

यापेक्षाही त्यावेळी व्हीडीओ, गाणी व ऑडिओ यांचा एक स्तर, दर्जा होता. एका बाजूला व्हीडीओमध्ये शाहरुख खान, सलमान खान असे मोठमोठे अभिनेते काम करीत आहेत आणि तिथे एका बाजूला हे सगळे चालले आहे. त्यावेळी आम्हीच आमचे मार्केट खाली आणले. इंडीपॉपसाठी एक वेगळे चॅनेल होते; मात्र रेडिओवाले म्हणाले की, टीआरपी येत नाही. त्यामुळे इंडीपॉप बंद झाले, असे शानने म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story