बोअर झाले म्हणून शो सोडला!

बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला. यंदाच्या सिझनची घोषणा जेव्हा झाली, तेव्हाच प्रेक्षकांना सरप्राइज मिळाले होते. हे सरप्राइज म्हणजे अभिनेता रितेश देशमुखची एण्ट्री. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचे सूत्रसंचालन रितेश करत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 2 Aug 2024
  • 03:21 pm
The fifth season of Bigg Boss Marathi, Riteish Deshmukh, Got bored and left the show!

संग्रहित छायाचित्र

बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला. यंदाच्या सिझनची घोषणा जेव्हा झाली, तेव्हाच प्रेक्षकांना सरप्राइज मिळाले होते. हे सरप्राइज म्हणजे अभिनेता रितेश देशमुखची एण्ट्री. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचे सूत्रसंचालन रितेश करत आहे. त्याआधी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर हे बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन करत होते.

‘बिग बॉस मराठी ५’चा नवीन प्रोमो पाहताच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. महेश मांजरेकर नाहीत, हे जाणून काहींनी नाराजीसुद्धा व्यक्त केली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मांजरेकरांनी बिग बॉस सोडण्यामागचे कारण सांगितले.  त्याचप्रमाणे रितेशच्या सूत्रसंचालनावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महेश मांजरेकर म्हणाले, “मी जेव्हा बिग बॉस मराठीच्या सूत्रसंचालनाला सुरुवात केली होती, तेव्हा माझा फक्त वर्षभराचाच करार होता. त्याआधी मी कधीच बिग बॉस पाहिले नव्हते. पण जेव्हा करार केला, तेव्हा शोचे काही एपिसोड्स पाहिले आणि हा गेम भारी आहे, असे वाटले. सूत्रसंचालनाला सुरुवात केली आणि असे एकाचे चार सिझन्स झाले. पण पाचव्या सिझनच्या वेळी आपण तेच तेच करतोय असे वाटले, मी जरा रिपिटेटिव्ह होतोय. त्यांना जे अपेक्षित असेल ते कदाचित माझ्याकडून येत नसेल. त्यामुळे मी बोअर झालो आणि शो सोडला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story