संग्रहित छायाचित्र
अभिषेक बच्चन याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. चित्रपटांसोबत अभिषेक बच्चन याचे खासगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिलेले आहे. अभिषेक बच्चन याने ऐश्वर्या राय हिच्यासोबत २००७ मध्ये लग्न केले. विशेष म्हणजे अत्यंत खास पद्धतीने यांचा विवाहसोहळा झाला. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांची एक मुलगी देखील आहे. ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न होण्याच्या अगोदर काही वर्षे अभिषेक बच्चन हा करिश्मा कपूरला डेट करत होता. पाच वर्ष यांनी एकमेकांना डेट करून लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ज्यावेळी करिश्मा कपूर ही अभिषेक बच्चन याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती, त्यावेळी ती बॉलिवूडची टॉप अभिनेत्री होती. करिश्मा कपूर हिने आपल्या करिअरची सुरुवात १६ व्या वर्षी केली. विशेष म्हणजे करिश्माने अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या. एका मागून एक हिट चित्रपट देताना करिश्मा कपूर दिसली. ज्यावेळी ती अभिषेक बच्चन याला ती डेट करत होती, त्यावेळी अभिषेक बच्चन याने चित्रपटांमध्ये काम करण्यासही सुरुवात केली नव्हती.
हेच नाही तर ज्यावेळी अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचा साखरपुडा झाला, त्यावेळी त्याने पहिलाच चित्रपट केला होता. साखरपुडा होऊनही अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचे लग्न होऊ शकले नाही. असे सांगितले जाते की, अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचे लग्न तोडण्यात दोघांच्याही आईचा हात होता. सुरुवातीच्या काळात बच्चन आणि कपूर दोन्ही कुटुंबीय आनंदात होते. जया बच्चन यांची अशी अट होती की, लग्नानंतर करिश्मा कपूर हिने चित्रपटांमध्ये काम करू नये. करिश्मा कपूरची आई बबीता कपूर यांना हे मान्य नव्हते. त्यासोबतच त्यावेळी अमिताभ बच्चन यांच्यावर कर्जाचा मोठा डोंगर होता. यामुळेही बबीता कपूर यांचा लग्नाला विरोध होता. अभिषेक बच्चन यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे, याबद्दलही करिश्माची आई संभ्रमात होती.
मुळात म्हणजे करिश्माच्या आईची अजिबात इच्छा नव्हती की, लग्नानंतर तिच्या मुलीला स्ट्रगल करण्याची वेळ यावी. शेवटी करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचा साखरपुडा तुटला. त्यानंतर करिश्मा कपूर हिने संजय कपूर याच्यासोबत लग्न केले. मात्र, करिश्मा कपूर हिने लग्नाच्या काही दिवसांनंतरच पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले आणि घटस्फोट घेतला.