मुलाच्या दिसण्यावरून सतत ट्रोलिंग

शोएबने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘आस्क मी ए क्वेश्चन’ या सेगमेंटद्वारे चाहत्यांच्या विविध प्रश्नांची मोकळेपणे उत्तरे दिली. यावेळी त्याने भविष्यातील प्रोजेक्ट्स, ट्रोलिंग आणि इतर बऱ्याच विषयांवर गप्पा मारल्या. मुलगा रुहानच्या ट्रोलिंगबद्दलही त्याने उत्तर दिले. तो म्हणाला, पब्लिक फिगर (सेलिब्रिटी) असल्याचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Tue, 18 Jun 2024
  • 05:08 pm
Entertainment news

संग्रहित छायाचित्र

शोएबने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘आस्क मी ए क्वेश्चन’ या सेगमेंटद्वारे चाहत्यांच्या विविध प्रश्नांची मोकळेपणे उत्तरे दिली. यावेळी त्याने भविष्यातील प्रोजेक्ट्स, ट्रोलिंग आणि इतर बऱ्याच विषयांवर गप्पा मारल्या. मुलगा रुहानच्या ट्रोलिंगबद्दलही त्याने उत्तर दिले. तो म्हणाला, पब्लिक फिगर (सेलिब्रिटी) असल्याचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात. एकीकडे तुम्हाला संपूर्ण जगातून प्रेम मिळत असते आणि दुसरीकडे काहीजण ट्रोलसुद्धा करतात, पण त्यांच्या ट्रोलिंगवर काही भाष्य करावे असे मला वाटत नाही, कारण ते त्यासाठीच मोकळे बसलेले असतात. त्यांना आमच्याकडून प्रतिक्रिया हवी असते, उत्तर हवे असते  आणि मला नेमके तेच करायचे नाही. जी व्यक्ती एका छोट्या मुलाचा तिरस्कार करू शकते, त्याच्याकडून तुम्ही कसली अपेक्षा करणार? लोकांना आमच्याबद्दल जे बोलायचे आहे ते बोलू द्या. मी त्याकडे लक्ष देत नाही.

काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दीपिका आणि शोएबने २०१८ मध्ये निकाह केला. दीपिकाचे हे दुसरे लग्न आहे. त्याआधी २०११ मध्ये तिने रौनक सॅमसनशी लग्न केले होते.  मात्र या दोघांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. २०१५ मध्ये दीपिकाने रौनकला घटस्फोट दिला. रौनकशी विभक्त झाल्यानंतर दीपिकाचे नाव शोएबशी जोडले गेले. शोएबशी लग्न केल्यानंतर दीपिकाने इस्लाम धर्म स्वीकारला होता. यासाठी तिने तिचे नाव बदलून फैजा असे ठेवले होते. काही दिवसांपूर्वी खुद्द दीपिकाने याची कबुली दिली होती.

शोएबशी लग्नानंतर दीपिकाने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. ती पुन्हा टेलिव्हिजनवर कधी परतणार, असा सवाल अनेकदा चाहत्यांकडून केला जातो. याविषयी उत्तर देताना दीपिका एका मुलाखतीत म्हणाली, “मी सध्या त्या मनस्थितीत नाही की मी बाहेर जाऊन काम करावे, रोज शूटिंगला जावे, तिथल्या कामाशी बांधिल राहावे, कारण अर्थातच जेव्हा तुम्ही एखादी भूमिका स्वीकारता, तेव्हा तुमच्यावर त्या मालिकेची बरीच जबाबदारी असते, त्या कामाप्रती तुम्हाला बांधील राहावे लागते. सध्या मी त्या गोष्टीसाठी तयार नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story