अण्णाचे पाय जमिनीवरच

बाॅलिवूड अभिनेता सुनील शेट्टी स्वत:ला मोठा उद्योगपती मानत नाही. त्याला फक्त इतका पैसा हवा आहे की त्याला आणि त्याच्या कुटुंबाला चांगलं आयुष्य जगता येईल. सुनील शेट्टी म्हणाला की, ‘‘मला कोणतेही साम्राज्य उभे करायचे नाही. माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतील, एवढी कमाई व्हावी, हीच माझी इच्छा असते. यापलिकडे व्यवसायाबाबत मी फार विचार आणि चिंता करीत नाही.’’

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 24 Jun 2024
  • 02:33 pm
Entertainment news, Suniel Shetty

संग्रहित छायाचित्र

बाॅलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty )स्वत:ला मोठा उद्योगपती मानत नाही. त्याला फक्त इतका पैसा हवा आहे की त्याला आणि त्याच्या कुटुंबाला चांगलं आयुष्य जगता येईल. सुनील शेट्टी म्हणाला की, ‘‘मला कोणतेही साम्राज्य उभे करायचे नाही. माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतील, एवढी कमाई व्हावी, हीच माझी इच्छा असते. यापलिकडे व्यवसायाबाबत मी फार विचार आणि चिंता करीत नाही.’’

लोक सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसबद्दल आवडीने बोलतात. अनेक वर्षांपूर्वी मोठ्या समर्पणाने ते विकत घेतल्याचे सुनीलने सांगितले. तो म्हणाला, ‘‘या फार्महाऊससोबत माझ्या भावना जोडल्या गेल्या आहेत. काहीही झाले तरी मी हे फार्महाऊस विकणार नाही. एकाच वेळी चार वाहनांनी प्रवास करायला मला आवडत नाही. मी एका वाहनानेही समाधानी आहे.  आयुष्य चांगले जगणे महत्त्वाचे आहे. शोबाजी करण्यात काही अर्थ नाही.’’

सुनील शेट्टीबद्दल असे म्हटले जाते की, अभिनेता असण्यासोबतच तो एक मोठा उद्योगपती देखील आहे. दरवर्षी तो फक्त व्यवसायातून कोट्यवधी रुपये कमावतोत. यावर कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्याशी बोलताना सुनील म्हणाला, माझ्याबद्दल असं म्हटलं जातं की मी एक मोठा उद्योगपती आहे. जी योग्य गोष्ट नाही. तुम्ही मला चार वाहने घेऊन जाताना कधीच पाहणार नाही. मी दोन वर्षांपासून एकच कार चालवत आहे आणि मला त्यात कोणतीही अडचण नाही. घर विकत घेण्याचा प्रश्न आहे, तेव्हाच मी त्यात गुंतवणूक करेन जेव्हा मला असे वाटते की मला ते करावे. मी कधीही साध्या गोष्टीत पैसे गुंतवणार नाही. घर अशी एक गोष्ट आहे जिथे आपण बहुतेक वेळा राहतो, म्हणून ते सर्वोत्तम असले पाहिजे.

सुनील शेट्टी पुढे म्हणाला, ‘‘आज लोक म्हणतात सुनील शेट्टीचे फार्म हाऊस बघा. मी ते १६ वर्षांपूर्वी विकत घेतले. त्यावेळी त्याची किंमत एवढी नसावी. फार्म हाऊस बांधण्यामागचे एकमेव कारण म्हणजे मला तिथे अधिकाधिक वेळ माझ्या पत्नी आणि मुलांसोबत घालवायचा होता. मला वीकेंडला तिथे जाऊन शेती करायची होती. आज मी ४०० झाडे त्या ठिकाणी लावली आहेत, जिथे पर्वत होते. आता त्या घराची किंमत खूप जास्त आहे, ही वेगळी गोष्ट आहे.’’

मी खंडाळा फार्म हाऊस किंवा मुंबईतील घर कधीही विकणार नाही. माझ्या कुटुंबासाठी ही आर्थिक गुंतवणूक नसून भावनिक गुंतवणूक आहे. ही दोन्ही घरे आमच्यासाठी मौल्यवान आहेत, असेही सुनीलने एका  पश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story