अनन्या म्हणते, अनुभवांनी शिकवले...

बाॅलिवूडच्या नव्या जनरेशनमधील उल्लेखनीय अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या 'कॉल मी बे' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. नुकतेच एका मुलाखतीत अनन्याने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणाने सांगितले.

Bollywood, Emerging star, Ananya Pandey, Web series, Call Me Be, Interview, Personal life, Private aspects, Civic Mirror

अनन्या पांडे

बाॅलिवूडच्या नव्या जनरेशनमधील उल्लेखनीय अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या 'कॉल मी बे' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. नुकतेच एका मुलाखतीत अनन्याने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणाने सांगितले. ‘‘सेलिब्रेटी म्हणून प्रत्येक पावलावर लोक आपापल्या परीने जज करतात. करिअरच्या प्रारंभी मला ही मोठी समस्या जाणवली. त्या अनुभवातून मी खूप काही शिकले. आता मला त्याचा त्रास होत नाही,’’ असे अनन्याने स्पष्ट केले.    

एका मुलाखतीत अनन्या म्हणाली, ‘‘प्रत्येकाचा दृष्टीकोन असतो, लोक वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलतात. आपण कोणाबद्दल काय बोलतो? याचा काय परिणाम होईल, याचा बोलणारे कधीच विचार करत नसतात. हे लक्षात आल्यानंतर मी स्वत:मध्ये बदल केला. आता मी या निरुपयोगी निर्णयांकडे लक्ष देत नाही.

तुम्ही कितीही चांगलं केलं तरी कोणीतरी नेहमी नकारात्मकता शोधणार. त्यामुळे मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. मी प्रतिक्रियांवर व्यक्त होणे टाळण्याचा निर्णय घेतला आणि त्याची काटेकारपणे अंमलबजावणी करते. लोक त्यांना हवे ते बोलत राहू शकतात, त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही.’’

अनन्याने चित्रपटसृष्टीतील सौंदर्याच्या वाढत्या दर्जावरही आपले मत व्यक्त केले. ‘‘सुंदर दिसणे म्हणजे केवळ सौंदर्य नाही. व्यक्ती म्हणून तुम्ही आतून कसे आहात आणि तुम्ही इतरांवर कोणती छाप सोडता, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे,’’ असे अनन्याने सांगितले.

'कॉल मी बे' ही अनन्याची पहिली वेब सीरिज आहे, जी धर्माटिक एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनवण्यात आली आहे. या मालिकेत तिच्यासोबत विहान सामत, वीर दास, वरुण सूद, लिसा मिश्रा आणि निहारिका लिरादेखील दिसणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story