अनन्या पांडेच्या हिप सर्जरीची चर्चा

अनन्या गेल्या पाच वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तरी देखील ती तिच्या लूक्समुळे चर्चेत राहते. अनन्या तिच्या दिसण्यावरून ती किती त्रस्त आहे हे तिने स्वत: एकदा सांगितले होते. दरम्यान, नुकताच अनन्याने एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. इतकेच नाही तर अनन्याने सर्जरी केल्याची देखील चर्चा रंगू लागली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 5 Aug 2024
  • 02:01 pm
Bollywood , ananya panday. Hip Surgery, ananya panday trolled, film industry, Ananya's surgery was also discussed.

संग्रहित छायाचित्र

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची लेक अनन्या पांडेने वयाच्या १८ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तरी देखील प्रेक्षकांच्या मनात जागा करण्यास ती अपयशी ठरली. नेटकऱ्यांमध्ये ती सतत चर्चेत राहिली असून ती अनेकदा ट्रोल झाली आहे. अनन्या गेल्या पाच वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तरी देखील ती तिच्या लूक्समुळे चर्चेत राहते. अनन्या तिच्या दिसण्यावरून ती किती त्रस्त आहे हे तिने स्वत: एकदा सांगितले होते.  दरम्यान, नुकताच अनन्याने एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. इतकेच नाही तर अनन्याने सर्जरी केल्याची देखील चर्चा रंगू लागली.

अनन्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यात तिने हिप सर्जरी केल्याचे म्हटले जात आहे.  अनन्या पांडेने एक मिरर सेल्फी शेअर केली होती. अनन्याने नूडल पट्टिया असलेला ग्रे रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे, तर यावेळी सटल मेकअप आणि बन हेअरस्टाइलने तिचा लूक उठून दिसतो आहे.  त्यासोबत अनन्याने तिचा वॉडरोबही दाखवला आहे. 

अनन्याने हा फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी रेडिटवर शेअर केला आणि त्यासोबत त्यांनी सांगितले की अनन्याने हिप सर्जरी केली आहे. एका नेटकऱ्याने सांगितले की अनन्या नेहमीच तिच्या लूकवरून त्रस्त असते.  दरम्यान, अनन्या लवकरच 'कॉल मी बे' या ओटीटी सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजची निर्मिती इशिता मोइत्राने केली आहे आणि कॉलिन डी कुन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत वीर दास, गुरफतेही पीरजादा, विहान समत, वरुण सूद, मुस्कान जाफरी, लिसा मिश्रा, निहारिका लायरा दत्त आणि मिनी माथूर देखील दिसणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story