अक्षयचा भूत बंगला

अक्षयकुमारने सोमवारी (दि. ९) वयाची ५८ वर्षे पूर्ण केली. यावेळी त्याने आपल्या आगामी 'भूत बंगला' चित्रपटाची घोषणा केली.विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय आणि दिग्दर्शक प्रियदर्शन १४ वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत.

Akshay Kumar, Bhut Bangla, Priyadarshan, Upcoming film, 58th birthday, Civic Mirror

अक्षयकुमारने सोमवारी (दि. ९) वयाची ५८ वर्षे पूर्ण केली. यावेळी त्याने आपल्या आगामी 'भूत बंगला' चित्रपटाची घोषणा केली.विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय आणि दिग्दर्शक प्रियदर्शन १४ वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत.

या दोघांनी शेवटचे २०१० मध्ये रिलीज झालेल्या 'खट्टा मीठा'मध्ये एकत्र काम केले होते.‘भूत बंगला’ या चित्रपटाची घोषणा करताना अक्षयने एक ट्विट केले. त्याने लिहिले, ‘‘वर्षानुवर्षे माझ्या वाढदिवशी तुमच्या प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल धन्यवाद.’’

'भूत बंगला'च्या फर्स्ट लूकसह हे वर्ष साजरे करत आहे. १४ वर्षांनंतर प्रियदर्शनसोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. हे माझ्यासाठी स्वप्नातील आवडत्या गोष्टीसारखे आहे, असेही अक्षय म्हणाला.  

अक्षय-प्रियदर्शन या जोडीने आतापर्यंत हेराफेरी (२०००), गरम मसाला (२००५), भागम भाग (२००६), भूलभुलैया (२००७), दे दनादन (२००९) आणि खट्टा मीठा (२०१०) या सहा चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या जोडीचा सातवा चित्रपट 'भूत बंगला' हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. अक्षय कुमार आणि एकता कपूर यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तो पुढील वर्षी प्रदर्शित होईल.

 अक्षयने प्रियदर्शनसोबत आतापर्यंत केलेले सर्व चित्रपट हिट ठरले आहेत. दुसरीकडे, गेल्या दोन वर्षांपासून अक्षयची कारकीर्द उतरणीला लागली आहे.  यादरम्यान, त्याने १२ चित्रपट केले, त्यापैकी १० फ्लॉप ठरले. हिट ठरलेल्या दोन चित्रपटांमध्ये (ओएमजी २ आणि स्त्री २) अक्षय मुख्य भूमिकेत नव्हता. अशा परिस्थितीत त्याला प्रियदर्शनच्या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story