स्वप्नील प्रार्थनाचे रोमॅन्टिक गाणे भेटीला

‘बाई गं’ हा स्वप्नील जोशीचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील हे नवेकोरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. रिमझिमत्या प्रेमाने, दुनियेला मोहिनी घालणारे ‘बाई गं’ चित्रपटाचे नवीन गाणे ‘चांद थांबला‘ रिलीज झाले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Tue, 18 Jun 2024
  • 04:21 pm
Prarthana Behere

संग्रहित छायाचित्र

‘बाई गं’ हा स्वप्नील जोशीचा (Swapnil Joshi) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील हे नवेकोरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. रिमझिमत्या प्रेमाने, दुनियेला मोहिनी घालणारे ‘बाई गं’ चित्रपटाचे नवीन गाणे ‘चांद थांबला‘ रिलीज झाले आहे.  मराठी मनोरंजन विश्वातील एक रोमॅन्टिक हिरो अशी ओळख असलेला अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात आपल्या जुन्या ऑनस्क्रीन जोडीदारासोबत म्हणजेच प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) सोबत रोमान्स करताना दिसत आहे. या गाण्याचे बोल आणि त्याची चाल प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. हे गाणे सध्या सिनेरसिकांच्या मनावर रुंजी घालत आहे.

२०१५ मध्ये आलेला चित्रपट 'मितवा'नंतर आता  ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करायला सज्ज झाली आहे. एका मोठ्या गॅपनंतर स्वप्नील आणि प्रार्थना एकत्र काम करत आहेत. त्यामुळे आपल्या आवडत्या जोडीला बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मागील काही दिवसात प्रार्थनाने आपल्या सोशल मीडियावर या गाण्याची एक झलक फॅन्सला दाखवली होती. या गाण्यात अभिनेता स्वप्नील जोशी प्रार्थना सोबत थिरकताना दिसत आहे. कलाकार आणि संगीत सोबतच या गाण्याचं चित्रीकरणसुद्धा तितकेच सुंदर आहे.

नितीन वैद्य प्रोडक्शन, एबीसी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘बाई गं’ चित्रपटाचे हे दुसरे गाणे आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरेसह सुकन्या मोने, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान सुद्धा आहे. अभय जोधपूरकर आणि आनंदी जोशी यांनी ‘चांद थांबला’ या गाण्याला आपला आवाज दिला आहे. तर वरून लिखते  यांचे संगीत आहे. गाण्याचे बोल समीर सामंत यांनी लिहिले आहेत. ‘चांद थांबला’ हे गाणे प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.  ‘बाई गं’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कुष्णा जाधव आणि विपूल देशमुख यांचे आहेत. तर ह्याचे संकलन नीलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. १२ जुलैपासून ‘बाई गं’ हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story