युवराज सिंगच्या जीवनावर बनणार बायोपिक

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. या घोषणेनंतर युवराज सिंगनेही प्रतिक्रिया दिली आहे. मीडिया ब्रीफिंग दरम्यान, युवी म्हणाला की त्याला आशा आहे की त्याचा बायोपिक लाखो लोकांना त्यांच्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रेरित करेल.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 22 Aug 2024
  • 11:27 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

दिग्गज भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगच्या जीवनावर चित्रपट बनणार आहे. भूषण कुमार आणि रवी भागचंदका युवीच्या बायोपिकची निर्मिती करणार आहेत.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. या घोषणेनंतर युवराज सिंगनेही प्रतिक्रिया दिली आहे. मीडिया ब्रीफिंग दरम्यान, युवी म्हणाला की त्याला आशा आहे की त्याचा बायोपिक लाखो लोकांना त्यांच्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रेरित करेल.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी पोस्ट शेअर करून युवराजच्या बायोपिकबद्दल माहिती दिली आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. युवीच्या बायोपिकची घोषणा करताना तरण आदर्श यांनी पोस्टमध्ये लिहिले, ‘‘क्रिकेटपटू युवराज सिंगवर बायोपिकची घोषणा होत आहे... भूषण कुमार आणि रवी भागचंदका हे क्रिकेट लीजेंड युवराजचे विलक्षण आयुष्य मोठ्या पडद्यावर आणतील. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही, मात्र त्याची संपूर्ण क्रिकेट कारकीर्द आणि जीवन यात दाखवण्यात येणार आहे.’’

 आपल्या बायोपिकबद्दल युवराज म्हणाला, ‘‘मला खूप सन्मान वाटत आहे. माझी कथा जगभरातील लाखो चाहत्यांना दाखवली जाईल. क्रिकेट हे माझे सर्वात मोठे प्रेम आहे आणि सर्व चढ-उतारांदरम्यान शक्तीचा स्रोत आहे. मला आशा आहे की हा चित्रपट इतरांना त्यांच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांचा अतूट उत्कटतेने पाठपुरावा करण्यास प्रेरित करेल.’’ युवराज हा भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक आहे. तो १७ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. या कालावधीत त्याने ४० कसोटी सामन्यांमध्ये ३३.९३ च्या सरासरीने १,९०० धावा, ३०४ एकदिवसीय सामन्यात ३६.५६ च्या सरासरीने ८,७०१ धावा आणि ५८ टी-२० सामन्यात २८.०२ च्या सरासरीने १,१७७ धावा केल्या आहेत.

या आंतरराष्ट्रीय कालावधीत त्याने ७१ अर्धशतके आणि १७ शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याच्या नावावर १४८ आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. २००७ मध्ये टी-२० विश्वचषक आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला ट्रॉफी जिंकून देण्यात युवीने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story