... तर राऊत यांच्या घरात घुसायला वेळ लागणार नाही
#मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाची तीव्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहे. राऊत यांच्या आरोपाला उत्तर देताना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्या म्हणाल्या की, राऊत याच्या फोटाला आज चप्पलाचा हार घातला आहे. पुन्हा त्यांनी असेच आरोप केले तर महिला सेनेला त्यांच्या घरात घुसायला वेळ लागणार नाही. भविष्यात राऊत यांनी तोंड सांभाळून बोलावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपली हत्या करण्यासाठी राजा ठाकूर या गुंडाला सुपारी दिली असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला होता. या आरोपानंतर शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतला असून शीतल म्हात्रे यांनी या प्रकरणी राऊत यांच्यावर कडाडून टीका केली आहे. आंदोलनावेळी आज राऊत यांच्या फोटोला चप्पल मारली आहे. राऊत असेच जर खोटे-नाटे आरोप करत राहिले तर महिला सेना त्यांना सोडमार नाही. त्यांच्या घरात घुसायला वेळ लागमार नाही, ही बाब त्यांनी लक्षात ठेवावी असे त्या म्हणाल्या.