तेरेशीचा शिमगा
कोकणात शिमगा साजरा करण्याचा उत्साह बघण्यासारखा असतो. शिमगा पाहण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी चाकरमान्यांची मोठी गर्दी होते. रत्नागिरीच्या आसपास अशी गावे आहेत जेथे त्रयोदशीला होम पेटवले जातात. याला तेरेशीचा शिमगा म्हणतात. असाच तेरेशीचा शिमगोत्सव करजुवे येथे मोठ्या जल्लोषात पार पडला.