भावी मुख्यमंत्रीपदाच्या बॅनरवरुन अजित पवारांना चिमटे
#मुंबई
गेल्या काही दिवसांपासून भावी मुख्यमंत्रीपदाच्या बॅनरवरुन राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होऊ लागली आहे. शुक्रवारी त्याचे पडसाद त्याचे पडसादही विधानसभेतही उमटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना भावी मुख्यमंत्रीपदाच्या बॅनरवरुन अजित पवारांना चिमटे काढले.
‘‘जयंत पाटील, अजित पवार तुम्ही आणि इतर लोकांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. अजितदादा तुम्हीच सांगितले आहे की साईजसुद्धा एकच आहे. त्यामुळे तुम्ही एकदा ठरवून घ्या. कुणाचं तरी नंतर फिक्स करून घ्या. आपण नंतर बघू त्याचे काय करायचे ते,’’ असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसला टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागला. त्यानंतर माझा भावी मुख्यमंत्री म्हणून लागला. नंतर सुप्रिया सुळे यांचा बॅनर लागला होता. बॅनरची साईज एकच आहे. त्यामुळे त्याची चौकशी करून कारवाई करा,’’ अशी मागणी अजित पवार यांनी केली होती. अशा प्रकारचे कृत्य जाणीवपूर्वक केले जात असून त्यांच्यावर कारवाईची मागणी यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी केली होती. राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयाच्या बॅनरवरुन मुंबई पोलिसांकडे यापूर्वीही राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून चौकशीची मागणी करण्यात आली होती. आता पुन्हा अजित पवार यांनीही मागणी केली आहे.