हापूस आंब्याचे उत्पादन यंदा कमी

हापूस आंब्याच्या उत्पादनात यंदा घट झाली आहे. मागील २० वर्षांच्या तुलनेत यंदा हापूस आंब्याचे उत्पादन लक्षणीयरित्या घटले आहे. बदलते हवामान आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे फळांच्या राजाला हा फटका बसला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 4 Mar 2023
  • 01:14 am
हापूस आंब्याचे उत्पादन यंदा कमी

हापूस आंब्याचे उत्पादन यंदा कमी

#रत्नागिरी

हापूस आंब्याच्या उत्पादनात यंदा घट झाली आहे. मागील २० वर्षांच्या तुलनेत यंदा हापूस आंब्याचे उत्पादन लक्षणीयरित्या घटले आहे. बदलते हवामान आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे फळांच्या राजाला हा फटका बसला आहे.

वाढत्या उष्णतेसह थ्रिप्सचा मोठा फटका यंदा हापूस आंब्याला बसला आहे. कोकणातील हापूसला जगाच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मात्र, यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनात घ झाली आहे. बदलतं वातावरण आणि पिकावर पडणारा रोगाचा प्रादुर्भाव याचा मोठा फटका आंबा पिकाला बसला आहे. सध्या वातावरणात सातत्यानं चढ-उतार होत आहे. पहाटे थंडीचा कडाका आहे तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मात्र, मोठा फटका बसत आहे.

आंब्यावर थ्रिप्स या रोगाचा प्रादुर्भावदेखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोठ्या प्रमाणात औषध फवारण्या करुनदेखील थ्रिप्सचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दिवसा तापमानात झालेल्या वाढीमुळे उष्माघाताचा फटका आंब्याला बसला आहे. आंब्यावर डाग उठल्याने आंबे खराब होऊन गळू लागले आहेत. सन बर्न झालेले हे आंबे बागायतदारांना फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. बदलत्या वातावरणामुळं आंब्याला कमी बहर आल्यानं १५ एप्रिल ते १५ मे यादरम्यान हापूसचा तुटवडा भासणार असल्याची माहिती आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे.वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest