अखेर नाफेडकडून कांदा खरेदी सुरू

नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातून कांदा खरेदी सुरू असून शेतकऱ्यांच्या कांद्याला नाफेडच्या माध्यमातून उचल मिळत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे. कांदा निर्यात बंद नव्हती, तर निर्यात सुरू आहे. पण विरोधकांकडून अप्रचार सुरू असल्याची टीका भारती पवार यांनी यावेळी केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 1 Mar 2023
  • 02:18 am
अखेर नाफेडकडून कांदा खरेदी सुरू

अखेर नाफेडकडून कांदा खरेदी सुरू

शेतकऱ्यांसमोर राज्य सरकार झुकले; दोन दिवसात ३ हजार क्विंटल कांद्याची खरेदी

#नाशिक

नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातून कांदा खरेदी सुरू असून शेतकऱ्यांच्या कांद्याला नाफेडच्या माध्यमातून उचल मिळत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे. कांदा निर्यात बंद नव्हती, तर निर्यात सुरू आहे. पण विरोधकांकडून अप्रचार सुरू असल्याची टीका भारती पवार यांनी यावेळी केली.

एकीकडे गेल्या काही दिवसांपासून कांदा प्रश्न पेटला असून राज्यभरात शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. याची दखल विधिमंडळाच्या सभागृहातदेखील घेण्यात आली. यावेळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर कांद्याला हमीभाव देण्याबाबत आंदोलन केले. शिवाय सभागृहातदेखील कांदा हमीभावाचा विषय मांडण्यात आला. अशातच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. नाशिकसह जिल्ह्यातील विविध भागात नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू करण्यात आली असून मागील दोन दिवसांत ३ हजार क्विंटल कांदा खरेदी झाल्याचे त्या म्हणाल्या.

नाशिकमध्ये कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून काल शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात आले. मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनात पालकमंत्री दादा भुसे  यांनी मध्यस्थी केली. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानंतर दुसरीकडे जिल्ह्यातून नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू झाल्याचे पवार यांनी म्हटले आहे. यावेळी मंत्री भारती पवार म्हणाल्या की, कांद्याचे पडलेले भाव सावरण्यासाठी नाफेडकडून कांदा खरेदी करण्यात येत आहे. दोन दिवसात ३ हजार क्विंटल कांद्याची खरेदी करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातून कांदा खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला नाफेडच्या माध्यमातून उचल मिळते आहे. कांदा निर्यात बंद नव्हती निर्यात सुरू असून विरोधकांकडून अप्रचार सुरू आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी निर्यात करावी. शेजारील राष्ट्राच्या आर्थिक स्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम झाला होता. यापुढेही कांदा निर्यात आणि नाफेडकडून कांदा खरेदी सुरू राहील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे.

साडेचारशे रुपयांपासून बाजार खुले

सोमवारी झालेल्या आंदोलनानंतर आजपासून पूर्ववत लिलाव प्रक्रिया सुरू झाली असून सुरुवातीच्या लिलावात साडेचारशे रुपयांपासून बाजार खुले झाले. कमीतकमी कमी हजार रुपये भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. मात्र आंदोलनानंतर परिस्थिती जैसे थे आहे. दुसरीकडे सभागृहात विरोधकांनी कांद्याला हमीभाव देण्याबाबत मागणीला जोर लावला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाफेडने कांदा खरेदी सुरू केली असल्याचे ते म्हणाले. ज्या भागात अद्याप कांदा खरेदी सुरू झाली नाही, त्या ठिकाणी लवकरात लवकर कांदा खरेदी सुरू होईल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest