कणेरी मठात ५२ गायींचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठातल्या ५२ गायींचा शुक्रवारी (दि. २४) मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आणखी ३० गायी गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 25 Feb 2023
  • 03:19 pm
कणेरी मठात ५२ गायींचा मृत्यू

कणेरी मठात ५२ गायींचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेने खळबळ, ३० गंभीर, शिळ्या अन्नातून विषबाधा

#कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठातल्या ५२ गायींचा शुक्रवारी (दि. २४) मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आणखी ३० गायी गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

या ठिकाणी पंचमहाभूत सुमंगलम लोकोत्सव सुरू असताना ही घटना घडली. या कार्यक्रमातील शिळे अन्न गायींनी खाल्ल्यावर त्यातून विषबाधा होऊन ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कार्यक्रम सुरू असतानाच ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. इतरही अनेक गायींना विषबाधा झालेली आहे. त्यापैकी गंभीर असलेल्या ३० गायींवर अद्यापही उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  काही दिवसांपूर्वी या लोकोत्सवाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर गुरुवारी (दि. २३) गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद्र गहलोत यांनीही मठात हजेरी लावली. मठावर हजारोंच्या संख्येने गायी असून सध्या जनावरांचे प्रदर्शन सुरू असल्याने मोठ्या संख्येने येथे जनावरे आणण्यात आली आहेत.

या कार्यक्रमात देशी प्रजातींच्या गाय, म्हैस, बकरी, अश्‍व, गाढव, कुत्रे आणि मांजर यांचे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

गायींचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. पठाण यांनी दिली. या जनावरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची माहिती फॉरेन्सिक विभागाकडून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मठाचे अधिपती काढसिद्धेश्वर स्वामी याबाबत म्हणाले, ‘‘कणेरी मठावर घडलेली घटना हा एक दुर्दैवी अपघात आहे. जाणीवपूर्वक कोणी करणार नाही. रस्त्यावरील गायी आणून त्यांचा सांभाळ करणारे आम्ही आहोत. त्यामुळे या गोष्टीचे मोठे दुःख आम्हाला आहे." वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest