संग्रहित छायाचित्र
पुणे: शहरातील टेकड्यांवर फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र या टेकड्यांवर लुटमारीच्या घटना वाढल्याने नागरिक दहशतीखाली आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी एका तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, शनिवारी (४ जानेवारी) दुपारी दोनच्या सुमारास तरुणी आपल्या मित्रासोबत सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडीवर फिरायला गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी तरुणीला आणि तिच्या मित्राला शिवीगाळ केली. तसेच त्यांना धमकावले. चोरट्यांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवला. तरुणीला मारहाण देखील केली. तसेच तिच्या गळ्यातील एक लाख रुपये किंमतीची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली.
तरुणी आणि तिचा मित्र घाबरले होते. घाबरलेल्या स्थितीत ते घरी गेले. सोमवारी तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.