Pune: शाळेत कपडे बदलताना विद्यार्थीनीचं रेकॉर्डिंग केल्यानं खळबळ, पाषाण भागातील नामांकित शाळेत घडली घटना

पुण्यातील पाषाण भागातील नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार समोर

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 8 Jan 2025
  • 04:19 pm
pune,Cirme News,Pune school,student recording,girl privacy violation,school scandal,Pune student issue,विद्यार्थीनीचं रेकॉर्डिंग,सीसीटीव्हीचा गैरवापर,बालहक्क

संग्रहित

शिक्षणाचे माहेरघर म्हणणाऱ्या पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतील शिपायानं चेजिंग रुममध्ये मोबाईल ठेवून कॅमेरॅद्वारे विद्यार्थीनीचे चित्रीकरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पाषाण भागातील नामांकित शाळेत घडली आहे. या प्रकरणी शिपायाविरोधात चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक झाली आहे. 

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार 6 जानेवारी ला घडला. शाळेत खेळाचा तास संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी शाळेत असलणाऱ्या किचन रुममध्ये ड्रेस चेंज करायला गेल्या. त्यावेळी  शिपाई सरोदे हा तिथे होता. त्याला पाहून विद्यार्थींनीनी त्याला तेथून जाण्यास सांगितले. तेव्हा जाण्यापूर्वी शिपाईने त्याचा मोबाईलचा कॅमेरा सुरु ठेवत रुममध्ये असलेल्या एका  स्विच बोर्डवर ठेवला. 

दरम्यान, हा सगळा प्रकार विद्यार्थिनींना लक्षात आला आणि तात्काळ त्यांनी व्हिडीओ मोबाईल मधून डिलीट केला. घडलेला संपूर्ण प्रकार विद्यार्थीनींनी त्यांच्या पालकांना सांगितल्यावर त्यांनी शाळेतील मुख्यधापिका यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिपाई सरोदे याला विचारले असता त्याने या प्रकरणाला नकार दिला मात्र हा प्रकार जेव्हा शाळेच्या व्यवस्थापनाला कळला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा सरोदे याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा मोबाईल रेकॉर्डिंग साठीच केला असल्याची कबुली दिली. 

यानंतर शाळेच्या व्याव्यस्थापानाने पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी ताक्ताळ गुन्हा दाखल करत सरोदे याला अटक केली. आरोपीच्या विरोधात पोक्सो सह बी.एन.एस  कलम ७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 

Share this story

Latest