संग्रहित छायाचित्र
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ‘ऑनर किलींग’ची एक घटना समोर आली आहे. आपल्या चुलत बहिणीने प्रेम केले म्हणून तिच्या भावाने तिला डोंगरावरून दरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथे ही घटना घडली. यामध्ये १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या महितीनुसार, वडगाव येथील १२ वीत शिकणारी १७ वर्षीय मुलीचे दुसऱ्या जातीतल्या एका मुलावर प्रेम जडले. ती त्या मुळसोबत पळूनही गेली होती. मात्र घरच्यांना हे सगळं पटत नव्हतं. घरच्या लोकांनी मुलीची कशीबशी समजूत काढली. तिला घरी आणले.
घरच्या लोकांनी मुलीला तिच्या काकाकडे वाळूज येथे पाठवले. काका, तिचा चुलतभाऊ यांनी तिची समजूत काढली. मात्र ती काही ऐकायला तयार नव्हती.
मुलीच्या चुलत भावाने याने तिला फिरायले नेले.तो तिला सोलापूर-धुळे महामार्गाजवळील खवड्या डोंगरावर घेऊन आला. तिथे त्याने तिची समजूत काढली. मात्र मुलगी काही ऐकायला तयार नव्हती. चुलत भावाला प्रचंड राग आला आणि रागाच्या भारत त्याने तिला डोंगराच्या २०० फुट खोल दरीत ढकलून दिले. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे.
चुलत भाऊ डोंगर उतरत होता. तेव्हा शेजारी एक क्रिकेटचा सामना सुरू होता. त्या सामन्याचे ड्रोनमध्ये शूटिंग सुरू होते. चुलत भाऊ डोंगर उतरत असताना तो त्या ड्रोनच्या कॅमेऱ्यात कैद झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चुलत भावाला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.