प्रातिनिधिक छायाचित्र....
Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन तरुणांनी एका तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करत खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पैसा फंड काच कारखान्यासमोर तळेगाव दाभाडे येथे घडली. मयूर अंकुश मते (वय 24, रा. तळेगाव दाभाडे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम अनिल भोसले (वय 28), अक्षय अनिल भोसले (वय 29, दोघे रा. तळेगाव दाभाडे) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर मते यांचे आरोपींसोबत मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून मयूर यांना ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी लाकडी दांडके व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये मयूर गंभीर जखमी झाले. या भांडणात मयूर यांचा दात पडला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.