गाडीला धक्का लागल्याचा जाब विचारल्याने तरुणाला बेदम मारहाण; कारच्या बोनेटवर फरफटत नेऊन जिवे मारण्याचा प्रयत्न

गाडीला धक्का मारल्याचा जाब विचारल्याने तिघांनी एका तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तरुणाला कारने धडक देऊन बोनेटवरून त्याला काही अंतर फरफटत नेले. ही घटना रविवारी (१ डिसेंबर) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्टेशन ते बिजलीनगर येथे घडली.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

गाडीला धक्का मारल्याचा जाब विचारल्याने तिघांनी एका तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तरुणाला कारने धडक देऊन बोनेटवरून त्याला काही अंतर फरफटत नेले. ही घटना रविवारी (१ डिसेंबर) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्टेशन ते बिजलीनगर येथे घडली. 

जेकेरिया जेकब मॅथ्यू (वय २३, रा. निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कमलेश उर्फ अशोक पाटील (वय २३, रा. बिजलीनगर, चिंचवड), हेमंत चंद्रकांत म्हाळसकर उर्फ सोन्या चंद्रकांत माळसकर (वय २६, रा. तळेगाव दाभाडे), प्रथमेश पुष्कल दराडे (वय २२, रा. वाल्हेकरवाडी चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र दुचाकी वरून जात होते. कमलेश याने त्याच्या कारने फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याचा कमलेश याला जाब विचारला. त्या कारणावरून कमलेश आणि त्याच्या मित्रांनी फिर्यादी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांना कारने धडक दिली. त्यात फिर्यादी कारच्या बोनेटवर पडले. आरोपींनी फिर्यादी यांना बोनेटवरून आकुर्डी रेल्वे स्टेशन येथून संभाजी चौक बिजलीनगर दरम्यान नेले. यामध्ये फिर्यादी जखमी झाले. त्यानंतर आरोपी पळून गेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest