Fake Recruitment Racket : मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने केला बनावट भरती रॅकेटचा पर्दाफाश

मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने दि. १३.१२.२०२३ रोजी केलेल्या कारवाईत बनावट भरती रॅकेटचा (Fake recruitment racket) पर्दाफाश केला आणि एका बनावट भरती हँडलरला पकडले. नरसिंह पै (Narasimha Pai) याच्याबद्दल लेखी तक्रार प्राप्त झाली होती.

Fake Recruitment Racket

मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने केला बनावट भरती रॅकेटचा पर्दाफाश

बनावट भर्ती हँडलर गजाआड

पुणे : मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने दि. १३.१२.२०२३ रोजी केलेल्या कारवाईत बनावट भरती रॅकेटचा (Fake recruitment racket) पर्दाफाश केला आणि एका बनावट भरती हँडलरला पकडले. नरसिंह पै (Narasimha Pai) याच्याबद्दल लेखी तक्रार प्राप्त झाली होती. पै याने दावा केला होता की त्यांचे रेल्वेमध्ये संपर्क आहेत आणि ६ लाख रुपयांची इच्छित रक्कम प्रदान केल्यानंतर २ महिन्यांच्या आत नोकरी देईल.  पै यांनी तक्रारदारास घाटकोपर स्टेशन येथे भेटण्यास सांगितले व सोबत एक लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्यासही सांगितले.

मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर तक्रार खरी असल्याची पडताळणी दक्षता पथकामार्फत करण्यात आली आणि त्यानुसार मुख्य दक्षता अधिकारी आणि निरीक्षकांच्या पथकाने २५ हजारच्या सरकारी चलनासह रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्‍यांचा घाटकोपर स्टेशनवर बनावट हँडलरला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. 

आरोपी नरसिंह आर पै याला ₹२५,०००/- लाच रकमेसह रंगेहात पकडण्यात आले.  त्याच्या ताब्यात सापडलेली रक्कम सापळ्यासाठी दिलेल्या चलनाशी जुळली, जप्त केलेली सदर रक्कम आणि नोटांची संख्या सारखीच होती याची पक्की खात्री दक्षता पथकाने केली. 

नंतर आरोपी पै याच्या मोबाईलची तपासणी केली असता तो पैसे गोळा करून बिहारमधील अन्य व्यक्तीस पाठवतो असे निरीक्षणास आले. गुन्हेगार नरसिंह आर. पै याने कबुली दिली की, तो काही लोकांच्या संगनमताने रेल्वेमध्ये खोट्या नियुक्त्या देण्याचे काम करीत असे.

भारतीय दंड विधान -४२० आणि ३४ अंतर्गत लोहमार्ग पोलीस यांचेमार्फत गुन्हेगार नरसिंह पै वर गुन्हा दाखल करण्यात आला.  सदर बनावट भरतीच्या रॅकेटमध्ये सामील असलेल्या इतरांना पकडण्यासाठी पुढील तपास यंत्रणेमार्फत केला जात आहे.

प्रतीक गोस्वामी, मुख्य दक्षता अधिकारी आणि वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अजय कुमार, के डी मोरे आणि राजकुमार सिंग, मुख्य दक्षता निरीक्षक आणि सुरक्षा कर्मचारी ए एम आव्हाड, अरविंद यांच्या दक्षता पथकाने बुडके आणि एस एम कोतवाल यांनी गुन्हेगाराला पकडण्यात आणि अशा घटकांना बळी पडण्यापासून अनेकांना वाचवण्याचे उत्कृष्ट काम केले.

भारतीय रेल्वे लोकांना भरतीसाठी अशा बनावट हँडलर्सकडे न जाण्याचे आवाहन करत आहे, की सर्व शासकीय यंत्रणेत निवड व भरती प्रक्रिया विशिष्ट मानक पद्धतीची आहे.  कोणाला आजूबाजूला असा कोणताही  अनुचित प्रकार सुरू असल्याचे आढळून आल्यास, त्यांनी पोलिसांकडे किंवा संबंधित दक्षता विभागाकडे तक्रार करण्याची विनंती रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest