Prostitution : वेश्या व्यवसाय प्रकरणी तिघांवर गुन्हा; दोन महिलांची सुटका

एका व्यक्तीने त्याच्या घरात वेश्या व्यवसाय चालवला. त्यासाठी त्याने दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवले असल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार रविवारी (दि. 19) सायंकाळी उघडकीस आला असून पोलिसांनी दोन महिलांची सुटका करत तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Prostitution : वेश्या व्यवसाय प्रकरणी तिघांवर गुन्हा; दोन महिलांची सुटका

संग्रहित छायाचित्र

एका व्यक्तीने त्याच्या घरात वेश्या व्यवसाय (prostitution) चालवला. त्यासाठी त्याने दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवले असल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार रविवारी (दि. 19) सायंकाळी उघडकीस आला असून पोलिसांनी दोन महिलांची सुटका करत तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अंमलदार संदीप शेप यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक महिला, पारधी (पूर्ण नाव माहिती नाही), देविदास अप्पासाहेब हनवते (वय 53, रा. एमआयडीसी भोसरी. मूळ रा. वखारी, ता. जि. जालना) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देविदास याने त्याच्या राहत्या घरात वेश्या व्यवसाय चालवला. त्याने दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी रविवारी सायंकाळी पावणे सहा वाजता आरोपीच्या घरावर छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी दोन पिडीत महिलांची सुटका केली. तर देविदास हनवते याला अटक केली. पिडीत महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्यानंतर मिळालेल्या पैशांवर आरोपींनी आपली उपजीविका भागवली असल्याचे तपासात समोर आले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest