पुणे : ‘तू पोलीस ठाण्याच्या बाहेर ये तुझ्याकडे बघते’ म्हणत महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

पुण्यात एका दारुड्याने भर रस्त्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच आता एका महिला पोलीस हवालदाराला धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

उच्चशिक्षित महिलेविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात एका दारुड्याने भर रस्त्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच आता एका महिला पोलीस हवालदाराला धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला आहे. ‘तू पोलीस ठाण्याच्या बाहेर ये तुझ्याकडे बघते’ तुमची पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहे’ म्हणत एका उच्चशिक्षित महिलेने धक्काबुक्की केली आहे. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्ररकरणी पोलीस हवालदार शीतल लक्ष्मण जमदाडे (वय ४०) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. साबिया इरम अक्रम खान असे धक्काबुक्की करणाऱ्या महिलेचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  साबिया खान हिच्याविरुद्ध नौशीन फैय्याज शेख यांनी तक्रार दिली होती. किरकोळा वादातून तक्रार दिल्याने पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती.
सोमवारी (२२ जुलै) रात्री साडेआठच्या सुमारास साबिया कोंढवा पोलीस ठाण्यात आली. तिने पोलीस ठाण्याचे कामकाज सांभाळणारे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. ‘तुम्ही दहावी उत्तीर्ण पोलीस आहात. आमच्यामुळे तुमचा पगार होतो. मी उच्चशिक्षित असून, तुमची पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहे’, अशी धमकी तिने दिली. तसेच पोलीस ठाण्यात अरेरावी करून तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.साबिया खानने पोलीस ठाण्यात ठेवलेल्या गुन्हे नोंदविण्याच्या वहीचे पान फाडून टाकले. त्यावेळी जमदाडे यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने जमदाडे यांच्या कानाखाली मारली.‘तू पोलीस ठाण्यात बाहेर. ये तुझ्याकडे बघते’, अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest