पुणे: पीएमपी बसचालकाला मारहाण करणारा पोलीस शिपाई निलंबित

पुणे: पीएमपीएमएल बसचालकाला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. राहुल वाघमारे असे कारवाई करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 26 Jul 2024
  • 12:17 pm
Pune News, Pune Police Constable, PMPML bus driver, DCP  Rohidas Pawar

संग्रहित छायाचित्र

पुणे: पीएमपीएमएल बसचालकाला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. राहुल वाघमारे असे कारवाई करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

दोन दिवसांपूर्वी पोलीस शिपाई वाघमारे हे मोटारसायकलवरून बंडगार्डन रस्त्याने जात होते. त्यावेळी याच रस्त्याने पीएमपी बस जात होती. बस शेजारून भरधाव गेल्याने वाघमारे चिडला होता. त्याने बसला मोटारसायकल आडवी घालत बस थांबवली. बसमध्ये घुसून चालकाला मारहाण सुरू केली होती.

या हल्ल्यात बसचालक भगवान तोरणे यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण झाली होती. ही भांडणे मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यास गेलेल्या वाहकालादेखील वाघमारे याच्याकडून मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर वाघमारे आणि पीएमपी चालकात समेट झाला. वाघमारेने तोरणेची माफी मागितली. वाघमारे याचे वर्तन अशोभनीय असून, पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली, असा ठपका ठेवून पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी त्याला निलंबित केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest