पुणे: भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर रोखले रिवॉल्व्हर; ठेका मिळविण्याच्या वादातून घडला प्रकार

महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील ठेका मिळविण्याच्या वादातून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर रिवाॅल्व्हर रोखून त्याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना गंजपेठेत घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 23 Jul 2024
  • 03:38 pm
Bharatiya Janata Party, Party Worker, Revolver, Pune Crime News, Ganjpeth

संग्रहित छायाचित्र

, कनिष्ठ अभियंत्यासह भावावर गुन्हा

महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील ठेका मिळविण्याच्या वादातून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर रिवाॅल्व्हर रोखून त्याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना गंजपेठेत घडली.

या प्रकरणी महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंत्यासह त्याच्या भावाविरुद्ध खडक पोलिसांनी रविवारी (दि. २१) रात्री गुन्हा दाखल केला. या प्रकरणी कनिष्ठ अभियंता गणेश राजेंद्र गिते (वय ३७), त्याचा भाऊ महेश (वय ३५, दाेघे रा. किराड गल्ली, भवानी पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत भाजपचे कार्यकर्ते निर्मल मोतीलाल हरिहर (वय ३६, रा. मंगल क्लब मित्र मंडळाजवळ, गंज पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्ते निर्मल हरिहर महापालिकेत ठेकेदार आहेत. ते रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीस निघाले होते. गंज पेठेतील मंगल क्लब मित्र मंडळाजवळ ते थांबले होते. त्या वेळी हरिहर यांच्या ओळखीतील महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंता गणेश गिते आणि त्याचा भाऊ महेश तेथे आले. गिते यांनी हरिहर यांच्या पोटाला  रिवाॅल्व्हर लावले. हरिहर यांना जातीवाचक शिवीगाळ केली. ‘‘तू दहा कोटी रुपयांचे टेंडर भरतो काय? तुझी लायकी आहे काय,’’ असे म्हणून हरिहर यांना जिवे मारण्याची धमकी दिली, असे हरिहर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, साहाय्यक आयुक्त मच्छिंद्र खाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी घटनास्थळी धाव घेतली. साहाय्यक आयुक्त खाडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

भाजपच्या माजी नगरसेवकासह १४ जणांविरुद्ध गुन्हा 
महापालिकेच्या ठेकेदारीतून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर रिवाॅल्व्हर रोखल्याप्रकरणी ठेकेदारासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यानंतर ठेकेदारानेही खडक पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली असून, भाजपच्या माजी नगरसेवकासह १४ जणांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे.

 गणेश गिते यांनी खडक पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निर्मल हरिहर, संग्राम हरिहर, भाजपचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर, मोतीलाल हरिहर, राहुल हरिहर, शुभम उर्फ गोट्या कांबळे, घोडके यांच्यासह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest