संग्रहित छायाचित्र
पुणे : पुणे विमानतळावरून वेगवेगळ्या दिशेने गेलेली ११ विमाने बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी एकाने ट्विटवर दिली आहे. याट्विटमुळे एकच खळबळ उडाली असून पुणे विमानतळावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या प्रकरणी 'अॅटट लुकासनतुली २२७१' या ट्विटर हॅन्डल चालकाविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सारथी सर्वानंद पांडे (वय ३४, रा. दत्तकृपा सोसायटी, लोहगाव) यांनी विमानळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार अकासा एअरलाईन्सच्या गोवा ते पुणे, दिल्ली ते पुणे आणि पुणे ते कोलकाता प्रवासादरम्यान २२ ऑक्टोबर रोजी घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान क्षेत्रात नामांकित असलेल्या आकासा एअर कंपनीच्या अकरा विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे ट्विट केले. तसे मॅनेजरला एक मेल करुन पुण्यावरून परदेशासह देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी निघालेल्या विमानात बॉम्ब असून बॉम्ब थोड्याच वेळात ब्लास्ट होणार आहेत. अशी धमकी देऊन विमानतळावर भीती निर्माण केली. लुकासातुली या ट्विटर हॅन्डलवरून अकासा एअरलाईन्स या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर संदेश पाठविण्यात आला. त्यामध्ये ‘दहशतवादी लुकास आणि तुलीप यांनी तुमच्या अकरा फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवला’ असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर विमानतळ प्रशासनाने सतर्क होत कंपनीकडून सर्वत्र तपासणी करण्यात आली. मात्र काहीही आढळून आले नाही.
दरम्यान, हा खोडासाळपणे कोणी तरी अफवा पसरविण्यासाठी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान ज्या ट्विटर हॅन्डलवरून हा संदेश पाठविण्यात आला त्या विरोधात अफवा पसरवून भीतीदायक वातावरण निर्माण करून विमानातळावरील प्रवाशांच्या आणि कंपनीच्या कामगारांच्या जीवीतास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात धमकीचा मेल २२ ऑक्टोबर रोजी करण्यात आला होता. त्यानंतर कंपनीने पांडे यांच्याकडे ही माहिती देत कंपनीच्या विमानांची तपासणी केली. विमानात काहीही संशयास्पद आढळून आले नाही. ही अफवा असल्याचे समोर आले आहे. धमकीची माहिती समजताच सुरक्षा यंत्रणांनी तातडीन पाहणी केली. राज्यात शॉपींला मॉल उडवून देणे, विमानतळावर बॉम्ब ठेवणे, सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करणे अशा विविध धमक्या दिल्याच्या राज्यात ८५ गु्न्ह्यांची नोंद झाली आहे. सायबर पोलिसांकडून याचा तपास सुरु आहे. पुणे विमानतळावरील प्रवाशांना कोणतीही भीती नाही. घाबरण्यासारखे काहीही नाही.
- साहेबा पोटे, सहायक पोलीस निरीक्षक, पुणे विमानतळ पोलीस ठाणे.