Pune Crime News : ‘डॉमिनोझ पिझ्झा’ शॉपमध्ये चोरी

‘डॉमिनोझ पिझ्झा’ शॉपमधील व्यवस्थापकाच्या टेबलच्या ड्रॉव्हरमधून हजारो रुपये लंपास करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १४ ऑक्टोबर रोजी सदाशिव पेठेमधील शॉपमध्ये घडला.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : ‘डॉमिनोझ पिझ्झा’ शॉपमधील व्यवस्थापकाच्या टेबलच्या ड्रॉव्हरमधून हजारो रुपये लंपास करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १४ ऑक्टोबर रोजी सदाशिव पेठेमधील शॉपमध्ये घडला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एका कामगारावर गुन्हा दाखल केला आहे. 

चक्रधर बापूराव क्षीरसागर-स्वामी (वय २१, रा. नांदेड सिटी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विपुल काशीनाथ कोळी (वय २२, रा. रेणुका अपार्टमेंट, शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉमिनोझ पिझ्झा येथे काम करतात. त्यांच्या शॉपमध्येच आरोपी स्वामी हा देखील काम करतो. त्याने व्यवस्थापकाच्या केबिनमध्ये असलेल्या टेबलच्या ड्रॉव्हरमधील ७० हजार २०० रुपये चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest