संग्रहित छायाचित्र
पुणे : शहरासह उपनगर भागात दागिने, मोबाईल चोरीची प्रकरणे वाढू लागली आहेत. पादचाऱ्यांचा मोबाईल हिसकाणे तसेच महिल्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरुन नेण्याचे प्रकार घडत आहे. अशीच एक घटना चक्क केळकर रस्त्य्यावरील नारायण पेठ पोलीस चौकीसमोर घडली असून पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल चोरट्याने चोरला. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ नागरिक नारायण पेठेतील एका सोसायटीत राहायला आहेत. दोन दिवसांपूर्वी ते रात्री पावणेअकराच्या सुमारास जेवण करुन फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले. चोरट्याने नारायण पेठ पोलीस चौकीजवळ त्यांचा मोबाइल चोरून नेला. मोबाइल चोरणाऱ्या चोरट्याचे वय अंदाजे २० ते २२ वर्ष आहे. मोबाइल चोरल्यानंतर चोरटा पळून गेल्याचे ज्येष्ठाने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. शहरात सातत्याने अशा घटना घडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरात सातत्याने मोबाइल चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र पोलिसांना या घटनांवर नियंत्रण आणण्यास अपयश आल्याचे दिसून येत आहे. मोबाईल चोरी गेल्यानंतर त्याचा तपास लागेल याची श्वाशवती नाही. त्यामुळे चोरट्यांकडून मोबाईल सत्र सुरु आहे. चोरीचे मोबाईल परराज्यात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे अनेकदा समोर आहे. पुणे पोलिसांनी गेल्या काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेल्या मोबाईलचा तपास करण्याची मोहिम आखली होती. तशी मोहिम पोलिसांनी राबविणे आवश्यक असल्याचे पुणेकरांचे म्हणणे आहे.