पुण्यात खोक्यात आढळला मृतदेह... पोलिसही चक्रावले
पुणे : खून केल्यानंतर आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कशाचा वापर करतील याचा नेम नाही. हडपसरमध्ये पुठ्ठयाच्या एका खोक्यात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. खोक्यात कोंबलेला मृतदेह पाहून पोलिसही चक्रावले आहेत. दरम्यान, खून झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमध्ये असलेल्या हिंगणे मळा कालव्याच्या शेजारी शुक्रवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. एका अनोळखी व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह एका खोक्यात भरण्यात आला. या खोक्याला सर्व बाजूने प्लास्टीक गुंडाळण्यात आले होते. हे खोके हिंगणे मळा कॅनॉलच्या शेजारी फेकून देण्यात आला. या खोक्यात मृतदेह असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खोके उघडले असतं हा मृतदेह बांधलेल्या अवस्थेत असल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.