पिंपरी-चिंचवड : कोयता गॅंगची दहशत! भोसरीतील गाडीची व दुकानाची तोडफोड; मेडीकल चालकास देखील मारहाण

काठ्या व कोयत्याने परिसरात दहशत निर्माण करत टोळक्याने गाडीची व दुकानाची तोडफोड करत मेडीकल चालकास देखील मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (१५ एप्रिल) भोसरी येथील महात्मा फुले नगर येथे घडली.

Koyta Gang

संग्रहित छायाचित्र

काठ्या व कोयत्याने परिसरात दहशत निर्माण करत टोळक्याने गाडीची व दुकानाची तोडफोड करत मेडीकल चालकास देखील मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (१५ एप्रिल) भोसरी येथील महात्मा फुले नगर येथे घडली. (pimpri chinchwad crime) 

याप्रकरणी धिरज राजीव कांदे (वय २९ रा.पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, यावरून पोलिसांनी चेतन महेंद्र मनोहर (वय १९ रा.भोसरी)   मुआज फिरोज मुजावर (वय १९ रा. भोसरी), जावेद इब्राहीम जावळे (वय १९) अजय नागेश कांबळे (वय १९) यांना अटक करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मेडीकलवर काम करत असताना आरोपी तेथे आले व त्यांनी मेडिकल समोर उभा असलेली कारच्या काचा फोडून गाडीचे नुकसान केले. तसेच फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून काठीने मारहाण केली. मेडिकलच्या काऊंटरच्या काचा फोडून त्यातील दीड हजार रुपये काढून घेतले. याप्रकारानंतर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest