Pune Crime News : तब्बल १४ लाखांचे मेफेड्रोन, एक पिस्तुलासह सराईत जेरबंद

पुणे : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन सराईतांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून १४ लाख ६० हजार रुपयांचे मेफेड्रोन, पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

तब्बल १४ लाखांचे मेफेड्रोन, एक पिस्तुलासह सराईत जेरबंद

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोन आणि खंडणी विरोधी पथक (२) ची कारवाई

पुणे : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन सराईतांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून १४ लाख ६० हजार रुपयांचे मेफेड्रोन, पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. हे आरोपी एक गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉबी भागवत सुरवसे (वय २८, रा. गजराज हेल्थ क्लबजवळ, लक्ष्मीनगर, येरवडा) आणि तौसिम ऊर्फ लडडु रहिम खान (वय ३२, रा. १२८२ , कसबा पेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक (२) आणि खंडणी विरोधी पथकाचे (२) अधिकारी शहराच्या मध्यवसतीत घालीत होते. त्यावेळी खबऱ्याने त्यांना बॉबी आणि तौसिम खान यांच्याबाबत माहिती दिली. हे दोघे शुक्रवार पेठेतील मारूती मंदिराजवळ थांबले असून, त्यांच्याकडे अमली पदार्थ तसेच पिस्तूल असल्याची माहिती मिळताच पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी सापळा लावत दोघांना शिताफीने पकडले. बॉबीच्या अंगझडतीमध्ये एक पिस्तूल, दोन काडतूसे आढळून आली. तसेच या दोघांकडे मोठ्या प्रमाणावर मेफेड्रोन आढळून आले. 

ही कारवाई गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक फौजदार सुनिल पवार, सुरेंद्र जगदाळे, साहिल शेख, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, अझिम शेख, आझाद पाटील, अझिम शेख, अमोल राऊत, पवन भोसले, नीलम पाटील यांनी केली. सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest