पिंपरी-चिंचवड : तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तरुणाने केली आत्महत्या

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. २७) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास इंद्रायणीनगर भोसरी येथे घडली.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

भोसरी : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. २७) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास इंद्रायणीनगर भोसरी येथे घडली. सिद्धार्थ अभिजीत जगदाडे (वय 20, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ जगदाडे याने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला भोसरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण समजू शकले नाही. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share this story

Latest