Pune Crime : भागीदाराकडून फ्लॅटचे कर्ज वापरण्यासाठी घेऊन त्याचाच केला खून; चौघांना अटक

जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसायामधील भागीदाराकडून फ्लॅटचे कर्ज वापरण्यास घेऊन घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता, त्याचाच खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हवेली पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 1 Dec 2024
  • 01:08 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

हवेली पोलिसांनी केली कारवाई,

जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसायामधील भागीदाराकडून फ्लॅटचे कर्ज वापरण्यास घेऊन घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता, त्याचाच खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हवेली पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

जीवन उर्फ बाळा शैलेश जगताप (वय २७, रा. भंडारी हॉटेलच्या मागे, दत्तवाडी), अक्षय उर्फ बाबू बालाजी शेलार (वय २४, रा. शिवरे, ता. भोर), साहेल उर्फ फुक्या साजिदअली जोरा (वय १९, रा. शिवरे बस स्टँडशेजारी, ता. भोर), देविदास उर्फ देवा लक्ष्मण तांबट (वय २०, रा. कांजळे, तांबट आळी, ता. भोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.  सतीश सुदाम थोपटे (वय ३७, रा. सुशीला पार्क, कोल्हेवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. अनिता सतीश थोपटे (वय ३१, रा. सुशीला पार्क, कोल्हेवाडी, खडकवासला) यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश थोपटे आणि भाऊसाहेब सदाशिव किवळे (रा. धायरी फाटा) यांचा भागीदारीत जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. थोपटे यांनी फ्लॅटवर कर्ज काढून कर्जाची रक्कम १८ लाख ५० हजार रुपये भाऊसाहेब किवळे याला दिले होते. हे कर्ज किवळे भरणार, असे ठरले होते. परंतु, त्यांनी कर्जाची रक्कम न भरल्याने थोपटे यांनी पैसे मागण्यास सुरुवात केली. पैसे मिळत नसल्याने त्यांनी किवळे याने कर्ज भरले नसून त्याची कर्ज भरण्याची लायकी नाही, असा मजकूर व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवला होता. त्याचा राग मनात धरून किवळे याने त्याच्या चार साथीदारांना पाठवून थोपटे याचा कोल्हेवाडी येथील घरासमोर २७ नोव्हेंबर रोजी दुपारी कोयत्याने वार करून खून केला होता.

लोकवस्तीत भरदिवसा हा गुन्हा घडला असल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सूचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तयार करून गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात चार अनोळखी गुन्हेगार कोयत्याने मारहाण करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. आरोपींची ओळख पटविण्याकरीता खबऱ्यांना सतर्क करण्यात आले. त्यातील एक आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार देवा लक्ष्मण तांबट हा असल्याचे समोर आले.

चारही आरोपी खेड शिवापूर परिसरात असून ते कोल्हापूरकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने ताबडतोब कारवाई करत चारही आरोपींना पकडले. प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपासकामी आरोपींना हवेली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. देवीदास उर्फ देवा तांबट याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. मुख्य आरोपी भाऊसाहेब किवळे याचा शोध सुरू आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेलीचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, दत्ताजीराव मोहिते, पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, अंमलदार हनुमंत पासलकर, रामदास बाबर, राजू मोमिन, मंगेश थिगळे, अमोल शेडगे, मंगेश भगत, वैभव सावंत, काशिनाथ राजापुरे, हवेली पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे, पोलीस अंमलदार विकास प्रधान, राजू मुंढे, संतोष तोडकर, महेंद्र चौधरी यांनी पार पाडली. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest