लिव्हाईस ब्रँडच्या नावाने बनावट कपड्यांची विक्री

आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध लिव्हाइस कंपनीच्या नावाने बनावट कपड्यांची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. एरंडवणे येथील दुकानामध्ये पोलिसांनी छापा टाकून ११८ जीन्स, शर्ट, टीशर्ट असा चार लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 1 Dec 2024
  • 01:27 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध लिव्हाइस कंपनीच्या नावाने बनावट कपड्यांची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.  एरंडवणे येथील दुकानामध्ये पोलिसांनी छापा टाकून ११८ जीन्स, शर्ट, टीशर्ट असा चार लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

‘ब्रँड काईड क्लोदिंग’ दुकानात ही कारवाई करण्यात आली. स्वामित्त्व हक्क कायद्यान्वये (कॉपीराईट ॲक्ट) अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एरंडवणे येथील गुळवणी महाराज रस्त्यावरील   या वस्त्रदालनात लिव्हाइस कंपनीच्या बनावट कपड्यांची विक्री होत असल्याची माहिती कंपनीतील अधिकारी राकेश सावंत यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार गुन्हे शाखेकडे दिली. गुन्हे शाखेच्या पथकाने वस्त्रदालनात छापा टाकला.

या कारवाईत लिव्हाईस कंपनीच्या ११८ जीन्स, १५ शर्ट, २४ टीशर्ट असा चार लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ब्रँड काईड क्लोदिंग या वस्त्रदालनाच्या मालकाविरुद्ध काॅपीराइट ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे, साहाय्यक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक रंगराव पवार, साहाय्यक निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक राजेश पाटोळे, संजीव कळंबे, विनोद भंडलकर, राकेश टेकावडे यांनी ही कारवाई केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest