खालच्या जातीच्या लोकांनी आम्हास काही बोलायचे नाही, नाहीतर आम्ही...
पुणे: भरधाव वाहनाने कट मारल्याने गाडी हळू चालवा असे सांगितल्याने शिवागाळी केली. तसेच खालच्या जातीच्या लोकांनी आम्हास काही बोलायची नाहीतर आम्ही वाट लावू, अशी धमकी (threat) दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विमान तळ पोलिस (Vimantal Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
भाऊ राहुल शिंदे (Bhau Shide) (४०,एस.आर.ए. कॉलनी, विमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार निरज प्रकाशचंद गुप्ता (रा. लुंकड गोल्डकोस्ट सोसायटी, विमाननगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात वाहतूक कोंडीने नागरिक त्रासले आहेत. वाहतूक कोंडी तसेच बेशिस्त वाहनचालकांमुळे अनेक वेळा अपघाताच्या घटना घडतात. त्यात वाहनचालकांकडून आरेरावी केली जाते. काही वेळेस हणामारीच्या घटना देखील घडल्या आहेत. अशीच एक घटना विमान नगर परिसरात घडली आहे. विमान नगर येथील एअरपोर्ट रोडकडे वळणाऱ्या रस्त्यावर भरधाव जाणाऱ्या वाहनाने एकाला कट मारला. कट मारल्याने अपघात होऊ शकतो, असा विचार करुन कट मारणाऱ्या वाहन चालकाला गाडी हळू चालव असे सांगितले. त्याचा त्याला राग आला. त्याने शिवागाळ केली. त्यातून फिर्यादी यांनी गाडी बाजूला घे असे सांगितले. त्यानुसार आरोपीने गाडी बाजूला घेतली. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला. फिर्यादी यांनी मी कोण आहे तुला माहित आहे का असे विचारल्याने दोघांमधील वाद चांगलाच पेटला. शिवीगाळ झाल्यानंतर वयक्तीक जातीवर येवून फिर्यादी यांची लायकी काढली. त्यानंतर फिर्यादी शिंदे यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. आणि घडलेल्या प्रकाराबाबत फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरुन घटनास्थळावरून जात असताना आरोपीने त्याच्या चारचाकी फिर्यादी यांना कट मारला. त्यावर फिर्यादी यांनी त्याला गाडी व्यवस्थीत चालव असे सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला गाडी साईडला घेण्यास सांगुन गाडी व्यवस्थित चालवा. असे सांगून मी बहुजन समाज पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश सचिव व कार्यकर्ता आहे. अशी ओळख करून दिली. यामुळे आरोपीला आणखी राग आला. त्याने रागातून "तु कोणी का असेना, तु दलीत आहेस का ? तर मग दलितांनी लायकीत रहायचे, अरे...दलीत.. मी कोण आहे तुला माहिती आहे का ? मी सुध्दा निरज गुप्ता आहे. खालच्या जातीच्या लोकांनी आम्हास काही बोलायचे नाही, नाहीतर आम्ही दलितांची वाट लावू" असे जातीवाचक बोलून फिर्यादी यांची लायकी काढली. यामुळे फिर्यादी शिंदे यांनी तत्काळ विमान नगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. शनिवारी दिवभर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याचे विमान नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी सीविक मिररला सांगितले.