धक्कादायक ! पुण्यात छेडछाडीला कंटाळून मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

हॉस्टेलमध्ये होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीने आत्महत्या (suicide) केल्याची घटना ताजी असतानाच कात्रज परिसरात एका मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime News

धक्कादायक ! पुण्यात छेडछाडीला कंटाळून मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : हॉस्टेलमध्ये होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीने आत्महत्या (suicide) केल्याची घटना ताजी असतानाच कात्रज परिसरात एका मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची दुसरी घडना घडली आहे. सोशल मिडीयावर तसेच प्रत्यक्षात सातत्याने संपर्क साधून तिच्या इच्छेविरुद्ध तिचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याने घाबरलेल्या मुलीने हे पाऊल उचलले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)   

अजिंक्य आवटे (Ajinkya Avate) (रा. भोसरी) आणि सुजल खुणे (Sujal Khune)  (रा. राम मंदिर, आंबेगांव पठार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पिडीत मुलगी १७ वर्ष ६ महिन्यांची आहे. ती शाळेला आणि क्लासला जात येत असताना आरोपी तिचा पाठलाग करीत होते. तिला सोशल मिडियाद्वारे तसेच प्रत्यक्ष संपर्कात रहात होते. तिच्या इच्छेविरुद्ध तिचे फोटो काढण्यात आले होते. ते फोटो समाजमध्यमाद्वारे व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे या मुलीने राहत्या घरी मानसिक तणावामधून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिने साडीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. याविषयी बोलताना वरिष्ठ निरीक्षक दशरथ पाटील म्हणाले, की घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ मुलीचा जबाब नोंदवून घेतला आहे. आरोपींचा शोध सुरू करण्यात आला असून आमचा तपास सुरू असल्याचे सांगितले. 

दक्षिण पुण्यामधील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि त्याच महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतीगृहात (हॉस्टेल) राहणाऱ्या रेणुका बालाजी साळुंके (वय १९) या विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. या हॉस्टेलमध्ये काम करणारा सतीश जाधव (रा. इंजिनियरींग हॉस्टेल कॅंटीन) हा तरुण तिला त्रास देत होता. तसेच, तिच्या खोलीत राहणारी महेंद्रसिंग सिद्ध (वय १९, रा. इंजिनियरींग कॉलेज हॉस्टेल, भारती विद्यापीठ) ही विद्यार्थिनी तिला विविध प्रकारे त्रास देत होती. त्यामुळे पिडीत विद्यार्थिनीने ७ मार्च रोजी स्वत:ला पेटवून घेतले होते. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तिची झुंज अपयशी ठरली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भादवि ३५४, ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास देखील सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest