Pune Crime : लैंगिक अत्याचाराला कंटाळून मुलाची आत्महत्या

लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली. ही घटना सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

सहकारनगर पोलिसांकडून तरुणाला अटक

पुणे : लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली. ही घटना सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. 

संकेत राजेश मोहिले (वय २६, रा. धम्मपाल संघाजवळ, ३१८ भवानी पेठ आणि मोहननगर, धनकवडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो), तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेला मुलगा आणि आरोपीची ओळख होती. आरोपीने या मुलाला आमिष दाखवत तळजाई टेकडीवर नेले होते. तेथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. त्याने मुलाबरोबर अश्लील कृत्य करून अनैसर्गिक अत्याचार केले. साधारण वर्षभरापूर्वी हा प्रकार घडला होता. 

या प्रकाराची आरोपीने मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढले होते. आरोपीने त्यानंतर, या मुलाला धमकाविण्यास सुरुवात केली. तसेच, त्याच्या मोबाईल संपर्क साधून पुन्हा हे कृत्य करण्याची सक्ती केली. त्याच्याकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून या मुलाने १५ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची पोलिसांची चौकशी केली. या चौकशीमध्ये आरोपीने त्याच्यावर अत्याचार केल्याचे तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी आरोपी मोहिलेला अटक करण्यात आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story